Beauty Tips : रिमुव्हर नसेल तर नखांवरचे नेलपेंट कसे काढावे? इथे आहेत भन्नाट ऑप्शन्स

नेलपॉलिश काढण्यासाठी घातक रसायने अथवा एसीटोन वापरू नका
Beauty Tips
Beauty Tips esakal

Beauty Tips :  

मुलींच्या मेकअप किटमध्ये नेलपेंट आणि रिमुव्हर हमखास असतेच. प्रत्येक लुकला मॅच होईल असे नेलपेंट लावण्याचा ट्रेंड आहे. तसेच सध्या नेल आर्टची सुद्धा चलती आहे. प्रवासाता वैगरे असताना नेलपेंट सोबत असेल पण नेलपेंट रिमुव्हर नसेल तर मात्र पंचाईत होते.

नेलपॉलिश काढण्यासाठी तुमच्याकडे नेलपॉलिश रिमूव्हर संपले असल्यास, तुम्ही इतर काही उपाय वापरून पाहू शकता. अनेक वेळा असे घडते की नेलपॉलिश रिमूव्हर घरी उपलब्ध नसते, अशा परिस्थितीत काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही नखांवरून नेलपॉलिश काढू शकाल.

Beauty Tips
Nail Extensions : नेल एक्स्टेंशन करताय? सावधान... या चुका पडू शकतात महागात..

नेलपेंट रिमूव्हर म्हणून टूथपेस्ट वापरा

टूथपेस्ट

नखांवरून नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता. ब्रशच्या साहाय्याने नखांवर टूथपेस्ट हलकी चोळा. टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा घालून नेलपॉलिश काढून टाकता येते. तसेच या पद्धतीने नखांचे नुकसानही होत नाही.

पाण्याचा वापर 

गरम पाण्यात नखे भिजवा. गरम पाण्यात नखे ठेवल्याने नेलपॉलिश निघून जाईल. नखे पाण्यात ठेवताना नेलपॉलिशचा थर काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला किमान २५ ते ३० मिनिटे नखे पाण्यात भिजवावी लागतील. याने नेलपॉलिश सहज काढली जाईल. 

Beauty Tips
Nail Extensions : नेल एक्सटेंशन कसे केले जाते ? नेल एक्सटेंशन केल्यानंतर अशी घ्या काळजी

लिंबू

नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता. नखांवर लिंबू लावा. लिंबाच्या रसाने नखांवरचे नेलपॉलिश निघून जाईल. नेलपॉलिश काढण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्या मिश्रणात हात भिजवा. यामुळे नेलपॉलिश पूर्णपणे निघून जाईल.     

हायड्रोजन पेरोक्साइड

नखांमधून नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरोक्साइड वापरू शकता. गरम पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. मिश्रणात नखे 5 ते 10 मिनिटे भिजत ठेवा. मग नेल फाइलरच्या मदतीने नेलपॉलिशचा थर काढण्यास मदत होईल. 

Beauty Tips
Nail Care Tips : कितीही उपाय केले तरी नखं तुटतातच, हे तेल लावा, सरर्रकन वाढतील नखं!

व्हिनेगर

व्हिनेगर नेलपॉलिश काढण्यास मदत करते. लिंबाचा रस व्हिनेगरमध्ये मिसळा. हे मिश्रण हातावर 10 मिनिटे लावा. कोमट पाण्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. या उपायाने नेलपॉलिश सहज काढली जाते. 

नेलपॉलिश काढण्यासाठी घातक रसायने अथवा एसीटोन वापरू नका. या रसायनांच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com