Beauty Tips
Beauty Tips esakal

Beauty Tips : चेहरा टवटवीत अन् ग्लोईंग बनवायचाय तर टोमॅटो फेशिअल करा, संपूर्ण फेशिअल ट्रिटमेंट घरच्या घरी

टोमॅटोचा फेस मास्क चेहऱ्याला लावणे आहे फायदेशीर

Beauty Tips :

जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा सॅलडची प्लेट सजवण्यासाठी तुम्ही किचनमध्ये ठेवलेले टोमॅटो अनेकदा वापरले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला हा लाल टोमॅटो जेवणाची चव तर वाढवतोच पण तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणून तुमच्या पार्लरमध्ये खर्च होणारे हजारो रुपयेही वाचवू शकतो.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करून त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. त्वचेवर टोमॅटोचा वापर केल्याने तुमच्या त्वचेची पीएच पातळी कायम राहते आणि दीर्घकाळ सुरकुत्या पडण्याची समस्या येत नाही.

Beauty Tips
Tomato For Health : रोज एक कच्चा टोमॅटो खाल्ला तर काय होईल? हे घ्या उत्तर

टॅनिंगची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर मानला जातो.फेशियलच्या पहिल्या टप्प्यात क्लीनिंग केली जाते. यासाठी टोमॅटोचा लगदा आणि कच्चे दूध एकत्र करून कापसाच्या पॅडच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

स्क्रबिंग

टोमॅटो फेशियलच्या या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला चेहरा स्क्रब करावा लागेल. यासाठी अर्धा टोमॅटो घ्या, टोमॅटोच्या कापलेल्या भागावर साखर आणि कॉफी पावडर घाला आणि टोमॅटो आणि साखरेच्या स्क्रबने 5 मिनिटे चेहऱ्यावर हळू हळू मसाज करा.

या स्टेपमध्ये तुम्हाला ते खूप जलद करण्याची गरज नाही. अन्यथा, साखरेचे दाणे त्वचेला त्रास देऊ शकतात. असे केल्याने त्वचेवरील मृत पेशी, टॅनिंग आणि काळे डाग दूर होतात. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

Beauty Tips
Face Care Tips : केळी चेहऱ्याला लावण्याचे आहेत जास्त फायदे, एकदा प्रयोग करून तर पहा

चेहऱ्यावर फेसपॅक लावा

स्क्रबिंग केल्यानंतर टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. असे केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमकते. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे टोमॅटो प्युरीमध्ये १ चमचे बेसन, २ चमचे दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चिमूट हळद घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे ठेवा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

Beauty Tips
Face Care Tips : चेहऱ्यावरील पिंपल्सची गर्दी हटवा, हा घरगुती फॉर्म्युला वापरून पहा!

फेस मास्क

चेहऱ्यावर फेस मास्क लावण्यासाठी टोमॅटोच्या कापांवर हळद लावा आणि 10 मिनिटे हलक्या हाताने फिरवत गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.

Beauty Tips
Face Care Tips : सीरम त्वचेसाठी चांगलं पण ते लावण्याचे नियम जाणून घ्या, नाहीतर त्वचा अधिकच करपायची

चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा

चेहऱ्यावर फेस मास्क लावल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका. यासाठी टोमॅटोच्या कापांवर कोरफडीचे जेल लावून 10 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने चेहऱ्याची त्वचा हायड्रेटेड आणि ग्लोइंग देखील राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com