Beauty Tips : चेहऱ्याच्या नॅचरल ग्लोसाठी घरीच बनवा चिंचेचा Bleach

चिंचेच्या मदतीने आपण त्वचा डागरहित आणि चमकदार बनवू शकता. जाणून घेऊया ही पद्धत
Beauty Tips
Beauty Tipsesakal

Tamarind Face Bleach : अनेकजण बाजारात उपलब्ध असलेल्या फेस ब्लीचच्या मदतीनं त्वचा उजळ करण्याचा प्रयत्न करतात. त्वचेला तजेलदार बनवण्याच्या या उपायांमुळे त्वचेला साईड इफेक्टही होऊ शकतात. केमिकल ब्लीचऐवजी नैसर्गिक ब्लीचची मदत घेतली तर जास्त फायदा होतो. त्वचेला डागरहित ठेवणे हा सौंदर्य टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. मात्र, वयानुसार त्वचेवर तपकिरी डाग आणि काळपट व्रण दिसू लागतात. असं सूर्यप्रकाश, प्रदूषण, हार्मोनल बदल, वाढतं वय इत्यादीमुळे होऊ शकतं. यावर चिंचेच्या मदतीने आपण त्वचा डागरहित आणि चमकदार बनवू शकता.

Beauty Tips
Beauty Tips: सेलिब्रिटीसारख्या उजळ चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे हायड्रेटिंग फेशिअल

त्वचेसाठी चिंचेचे फायदे

चिंचेचा कोळ त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार आणि स्वच्छ दिसते. AHA म्हणजेच अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड चिंचेमध्ये आढळते, ते निरोगी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. याशिवाय चिंचेमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला यूव्ही किरणांपासून वाचवण्यास मदत करतात आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.

Beauty Tips
Russian girls beauty secrets: काय आहे रशियन महिलांच्या सौंदर्याचे घरगुती राज

Bleach साठी लागणारं साहित्य

  • २ टीस्पून दही

  • १ टीस्पून चिंचेचा कोळ

  • टीस्पून कॉर्नफ्लोर

कृती

चिंचेपासून ब्लीच क्रीम बनवण्यासाठी प्रथम सुती कपड्यात दही ठेवा आणि त्यातील पाणी चांगले पिळून घ्या. आता त्यात चिंचेचा कोळ आणि कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करा.

Beauty Tips
Beauty Tips : पार्लरसारखा ग्लो घरच्या घरी; साखरेचे स्क्रब आजच ट्राय करा

चिंचेच्या ब्लीच पावडरसाठी साहित्य

  • २ व्हिटॅमिन सी गोळ्या

  • टीस्पून बेकिंग सोडा

  • अर्धा चमचा कस्तुरी हळद

पावडर कशी बनवायची

या सर्व गोष्टी एका भांड्यात टाका आणि नीट मिक्स करा.

Beauty Tips
Beauty tips: काजळ लावल्यावर होते डोळ्यांची जळजळ? वापरा बदामाचं काजळ

असे वापरा

चिंचेची ब्लीच क्रीम आणि चिंचेची ब्लीच पावडर एका भांड्यात मिसळा. चेहरा, मान आणि इतर ठिकाणी लावा. १५ मिनिटे त्वचेवर राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा. असं दर आठवड्याला केलात तर चांगला परिणाम दिसेल.

Beauty Tips
Beauty Tips: 'या' पाच घरगुती ट्रिक्स वापरा अन् हातावरील नेलपॉलिश सहज हटवा

ब्लीचचे फायदे

यामध्ये वापरल्या जाणार्‍या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते. त्वचेवरील डाग कमी करण्यासोबतच त्वचेला त्यातून भरपूर प्रथिनांचा पुरवठा होतो, ज्यामुळे त्वचेची चमकही वाढते.

कॉर्नफ्लोरमध्ये भरपूर ब्लिचिंग एजंट गुणधर्म असतात, ते डाग काढून टाकण्यास मदत करतात.

कस्तुरी हळद नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते आणि त्वचा चमकदार बनवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com