Beauty Tips : उठावदार अन् सुंदर लूकसाठी काजळ करेल मदत; लावण्याच्या 3 सोप्या पद्धती पहा

सध्या सणांचा हंगाम सुरू आहे. यावेळी प्रत्येक महिलेला इतरांपेक्षा हटके दिसावे असे वाटत असते.
Beauty Tips
Beauty Tips

अनेकांचे डोळे हा त्यांचा हृदयाचा आरसा असतो, असं म्हटंल आहे. डोळे सुंदर दिसण्याची जबाबदारी काजळावर टाकण्यात आली आहे. सध्या सणांचा हंगाम सुरू आहे. यावेळी प्रत्येक महिलेला इतरांपेक्षा हटके दिसावे असे वाटत असते. यासाठी वेगळ्या टीप्स आणि अलंकार, लूक शोधायची तयारी सुरु केली जाते.

या सणासुदींसाठी अनेक मुलींनी कपड्यांची, दागिण्यांची खरेदी सुरू केली आहे. प्रत्येकवेळी सण-उत्सवादरम्यान महिलांचा वेगवेगळ्या प्रकारचा लूक असतो. मात्र बहुतांशवेळा मेकअप एकच असतो. हा मेकअप थोडा बोल्ड दिसावा यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. तुमच्या लूकला आणखी सुंदर बनवण्यासाठी डोळ्यांवर काजळ मदत करते. त्यामुळे हे काजळ कसे लावाने याच्या काही सोप्या पद्धती आज आपण जाणून घेऊया...

Beauty Tips
Kitchen Astro Tips: स्वयंपाक घरातल्या ह्या गोष्टी कोणाला देत असाल तर सावधान, नाहीतर...

दोन रंगाचा मस्करा

आजकाल तरुणींमध्ये डोळ्यांवर दोन रंगांचा मस्करा लावण्याचा ट्रेंड आहे. डोळ्यांचा हटके लूक दिसण्यासाठी मुली काजळ लावण्याचा हा प्रकार वापरतात. दोन रंगांमध्ये असणारे हे काजळ डोळ्यांना उठावदार दिसते. तुमच्या वेस्टर्न ड्रेससोबत तुम्ही असे काजळ लावू शकता. तुम्ही दोन रंगीत आयशॅडोही वापरू शकता.

पांढरे काजळ

डोळे मोठे दिसण्यासाठी सध्या पांढरे काजळ बाजारात विक्रीसाठी आले आहे. पांढरे काजळ हे पारदर्शक असते. ते डोळ्यांच्या बाहेर पसरवून लावले जाते. यावर कोणत्याही रंगाचे काजळ लावले तरी डोळे मोठे दिसतात आणि लूक उठून दिसतो.

Beauty Tips
Weight Loss Tips : वाढलेलं वजन कमी करायचं तर या '4' गोष्टी फॉलो करा

पारंपारिक पोशाखासाठी काळे काजळ

काजल लावण्याची ही एक सोपी पद्धत आहे. काळे काजळ डोळ्यांना एकप्रकारे क्लासिक लूक येतो. पारंपारिक पोशाख आणि चांदीच्या दागिन्यांसह काजळाचा हा प्रकार अनेक तरुणी सध्या वापरतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यासोबत न्यूड लिप कलरही ट्राय करू शकता.

किलर कॅट लूक

या प्रकारची काजळ तुम्हाला पाश्चिमात्य देशातील महिलांच्या डोळ्यांमध्ये दिसते. पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या ड्रेस आणि लूकसोबत तुम्ही ही पद्धत वापरू शकता. यासाठी तुम्हाला ब्रशच्या मदतीने लाल, निळा आणि हिरवा असे रंगीत काजळ आणि लाइनर्स वापरता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com