
सणासुदीच्या काळात प्रचंड गोड खाऊन वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहाराच्या या चार टिप्स लक्षात ठेवल्या तर त्याचा वजन कमी करायला निश्चितच उपयोग होऊ शकतो.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर वाढलेले वजन चांगले नाहीच पण सौंदर्याच्या दृष्टीनेही वाढलेले वजन चांगले दिसत नाही. एकदा वजन वाढायला लागले की ते काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही. मग वाढलेले ही चरबी कमी करण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत राहतो.
शरीराच्या ठराविक भागांमध्ये वाढणारी ही चरबी आपल्या शरीराचा शेपही खराब करते. मग कधी आपण खूप व्यायाम करतो तर कधी क्रॅश डाएटसारखे पर्याय निवडतो. पण तरी काही केल्या वजन कमी व्हायचे नाव घेत नाही. डाएट करायचे म्हणजे खाणे-पिणे पूर्णच बंद करुन टाकायचे असे नाही तर डाएटचे काही नियम पाळल्यास वजन कमी होण्यास निश्चितच मदत होते. पाहूयात आहाराच्या कोणत्या गोष्टी नियमित पाळल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
● गोड पदार्थ खाणे टाळा.
आपल्याला माहित आहे की गोड खाल्ल्यामुळे वजन वाढते. मात्र तरीही समोर गोड आले की आपण स्वत:वर कंट्रोल करु शकत नाही. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोक्याचे असते. सतत गोड खाल्ले तर वजन वाढण्यास त्याची मदत होते. यामुळे केवळ वजनच वाढत नाही तर रक्तातील साखर वाढण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.
● रोजच्या जेवनात हिरव्या पालेभाज्या समावेश वाढवावा.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. इतकेच नाही तर या भाज्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास वजन घटण्यास मदत होते. यासाठी आपण पालक, मेथी, चुका, चाकवत, आळू, कोथिंबीर, चवळी, मुळ्याचा पाला अशा सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करु शकतो.
● सकाळचा ब्रेकफास्ट हेल्दी ठेवावा.
सकाळचा ब्रेकफास्ट हेल्दी असणे अतिशय आवश्यक आहे. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास तब्येत चांगली तर राहतेच पण वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे अशा पौष्टीक घटकांचा आहारात जरुर समावेश करायला हवा. यामुळे पोट तर भरलेले राहीलच पण शरीराचे पोषण होऊन वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
● फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करावा.
फायबर असलेले पदार्थ आहारात असायला हवेत. यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक तर मिळतातच पण पोट साफ होण्यासही फायबर्स अतिशय उपयुक्त ठरतात. बदाम, ब्रोकोली, सगळ्या प्रकारचे सलाड, सगळी धान्ये यांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. हे पदार्थ आहारात आवर्जून असायला हवेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.