
Skin Waxing Care tips : आजकाल प्रत्येकीला आपण चित्रपटातील अभिनेत्रीसारखं सुंदर दिसावं असं वाटतं.तिच्यासारखे हेअर कट करून, तिची फॅशन कॉपी करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न सुरू असतो. पण, त्यात अडथळा निर्माण होतो. तो शरीरावर असलेल्या केसांचा. चेहऱ्यावर, हाता पायावर असलेले केस तुमचे सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात.
नको असलेले केस काढून टाकण्यासाठी पार्लरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही वॅक्स करणं हे परवडणारं आणि सोप्प मानलं जातं. त्यामुळे पार्लरमध्ये स्त्रिया इतर गोष्टींसोबत वॅक्सिंग करतातच. पण, वॅक्स कराताना योग्य ती काळजी घेतली नाही. तर मग महागात पडू शकते.
काहीवेळा महिला घरीच वॅक्स करतात. वॅक्सिंग कराताना इजा होते. किंवा त्वचेला गंभीर इंफेक्शनचा सामना करावा लागतो. त्यामुळे पार्लरमध्ये गेल्यावर काय काय काळजी घ्यायची याच्या काही टिप्स पाहुयात.
स्कीनची काळजी
तुमची त्वचा अधिक सेंसेटीव्ह असेल. तर, वॅक्स करताना विषेश काळजी घ्यावी लागते. तुमच्या त्वचेला केमिकलयुक्त पदार्थ सूट होत नसतील. तर, वॅक्सिंग करण्यासाठी वापरत असलेले वॅक्सिंग किट चांगल्या क्विलिटीचं असेल याची काळजी घ्या.
वॅक्सवरील सुचना
वॅक्स लावून ते स्ट्रीप्सच्या सहाय्याने खेचून काढणे हा वॅक्सिंगचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र त्यासाठी वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सच्या डब्यावरच्या सूचना लक्षात घ्यायला हव्यात. वॅक्सिंग करण्याअगोदर त्वचेवर बर्फ फिरवला तर त्वचा थोडी बधीर होते व त्यामुळे वेदना कमी होतात.
मॉईश्चरायझर लावणे
वॅक्स गरम केल्यावर कोमट पाण्यात ठेवले म्हणजे ते लगेच घट्ट होत नाही तसेच वॅक्सवर लावण्यासाठी सुती कपड्याच्या ४ इंच रूंदीच्या पट्ट्या वॅक्स स्ट्रीप म्हणून वापरता येतील. वॅक्सिंग करून झाल्यावर पुन्हा एकदा त्वचा स्वच्छ करणे व मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
वॅक्स एक्स्पायर झालंय ?
केस काढण्यासाठी वापरले जाणारे वॅक्स एक्सापायर झालेलं नाहीय ना? हे तपासले पाहिजे. वॅक्सिंग करण्यापूर्वी आधी गुढगा आणि हाताच्या कोपरभोवती करा. कारण, कोपरांभोवतीचा भाग थोडा घट्ट आहे.
दुखापत झाली असेल तर
हे वॅक्स तुम्हाला शोभेल की नाही हे तुम्ही येथे प्रयत्न करू शकता. जर तुमच्या हाताला किंवा पायाला दुखापत झाली असेल तर वॅक्सिंग करताना याची विशेष काळजी घ्या. इजा किंवा जखमेच्या ठिकाणी चुकूनही मेण लावू नका. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
जास्त गरम नका करू
वॅक्सिंग करताना पटकन पट्टी काढू नका. असे केल्याने काही वेळा त्वचेतून रक्त येऊ लागते. वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा की ते जास्त गरम किंवा खूप थंडही नाही. यामुळे ते तुमच्या त्वचेवर व्यवस्थित पसरत नाही.
पहिल्यांदा वॅक्स करताना
उन्हात सतत फिरल्याने त्वचा काळी पडते म्हणजे टॅन होते तो टॅनही वॅक्सिंगच्या सहाय्याने कमी करता येतो. वॅक्सिंग घरच्याघरीही करता येते मात्र प्रथमच वॅक्सिंग करत असाल तर चांगल्या पार्लरमध्ये ते करावे हे उत्तम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.