Beauty Tips : ना ट्रिटमेंट ना पार्लर; तुमच्या घरात असलेला एक टोमॅटो तुम्हाला सुंदर बनवू शकतो, वापरून पहा

उजळ त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर टोमॅटो लावणे फायद्याचे ठरते
Beauty Tips
Beauty TipsESAKAL

Beauty Tips :

एखाद्या कार्यक्रमात पाहिलेली मुलगी, किंवा नवरीने ड्रेस, गेटअप, ज्वेलरी कशी घातली आहे हे पाहिलं जात नाही. तर, तिचा चेहरा किती रेखीव आहे, पिंपल्स किती होते याकडे जास्त लक्ष असतं. पिंपल जरी नसले तरी चेहरा निस्तेज आहे याची चर्चा पाहुणेमंडळीत रंगते.

त्याच उलट एखादी साधा ड्रेस घातलेली सिंपल मुलगी जीचा चेहरा उजळ, केस सुरेख लांब असतील तर ती कोणाची हे सर्व विचारतात. तिचं कौतुकही करतात.

या प्रसंगातून हेच लक्षात येत की तुमचा चेहरा डाग विरहीत, उजळ असायला हवा. त्यासाठी मोठे महागडे पार्लरमध्ये जाणे, ट्रिटमेंट करणे हे परवडणारे नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय तुम्हाला उजळ त्वचेचं गिफ्ट देऊ शकतात.

Beauty Tips
Spinach face packs : थंडीमध्ये त्वचा कोरडी पडलीय? पालक आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ फेसपॅक्स

उजळ त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर टोमॅटो लावणे फायद्याचे ठरते. टोमॅटो चेहऱ्याला पोषक घटक पुरवते. ज्यामुळे चेहऱ्यावरील पुरळ,डाग निघून जातात. डाग निघून गेल्याने तुमचा चेहरा पार्लरमध्ये न जाताही उजळ होतो. तर टोमॅटो कसे वापरायचे हे पाहुयात. (Face Pack)

असा बनवा टोमॅटो फेसपॅक

प्रथम मिक्सरमध्ये टोमॅटो चांगले बारीक करा आणि पेस्टमध्ये थोडे मध आणि कोरफड जेल घाला. ते चेहऱ्यावर लावून किमान अर्धा तास राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट वापरा.

टोमॅटोच्या पेस्टमध्ये व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल मिसळा. ते आठवड्यातून एकदाच लावावे लागते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. (Hair Care)

Beauty Tips
Face Pack For Winters : चमकदार चेहरा मिळविण्यासाठी क्रिमपेक्षा जिऱ्याचा फेसपॅक जास्त फायदेशीर ठरेल!

टोमॅटोची पेस्ट लावण्यापूर्वी तुम्ही टोमॅटोने तुमचा चेहरा स्क्रब देखील करू शकता. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, फक्त टोमॅटोचा तुकडा घ्या आणि किमान 15 मिनिटे चेहऱ्यावर चोळा. आपण इच्छित असल्यास, आपण टोमॅटोमध्ये थोडी चूर्ण साखर देखील घालू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com