Fitness Tips : केवळ ५ मिनीटांच्या योगासनांनी पोटाचा घेर होईल कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fitness Tips

Fitness Tips : केवळ ५ मिनीटांच्या योगासनांनी पोटाचा घेर होईल कमी

5 Minute Easy Yoga : एकूणच सगळ्याच दृष्टीने आपण फिट अँड फाईन असणे केव्हाही चांगले. पोटाच्या भागात लवकर चरबी वाढते आणि साठत जाते. मात्र ती कमी करायची म्हटली की काय करावे आपल्याला सुचत नाही. ही पोटावरची चरबी घटवण्यासाठी काही नेमके व्यायाम करणे अतिशय आवश्यक असतात. अवघ्या ५ मिनीटांत होणारे हे योगा कोणते ते पाहूया

हेही वाचा: Fitness Tips : 'या' कारणांमुळे मेहनत घेऊनही कमी होत नाही पोट

१. ताडासन

हे आसन दोन पद्धतींनी करता येते. दोन्ही पायाच्या चौड्यांवर उभे राहून एक हात कानाच्या दिशेने सरळ वर घ्यायचा आणि शरीर ताणायचे. पुन्हा खाली येऊन दुसरा हात वर घेऊन पुन्हा शरीर ताणायचे. यानंतर दोन्ही हात एकावेळी वरच्या बाजुला घेऊन ताणायचे.

हेही वाचा: Esha Gupta Fitness: ईशाला जीम करताना पाहिलं तर थकवा दूर होईलच शिवाय...

२. कोनासन

दोन्ही पायात अंतर घेऊन हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे. कंबरेतून खाली वाकत डावा हात उजव्या पायापाशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा. नजर वरच्या बाजूला उजव्या हाताकडे ठेवायची. असेच दुसऱ्या हातानेही करायचे.

हेही वाचा: Fitness : बेडवरच करा ही ३ योगासने आणि घटवा वजन

३. वज्रासन

हे अतिशय सोपे आसन असून नेहमी मांडी घालून बसण्यापेक्षा वज्रासनात बसणे पोटाच्या आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर ठरते. या आसनात डोळे मिटून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा.

हेही वाचा: Fitness Tips: अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकीत! जाणून घ्या

४. पर्वतासन

मांडी घालून बसावे आणि दोन्ही हात बाजुने डोक्यावर घेऊन हातांचा नमस्कार घालावा. हात वरच्या दिशेला ताणलेले राहतील असे पाहावे. हात आणि डोके समोर जमीनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. पोट कमी होण्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होतो.

हेही वाचा: Fitness Freak Faral : गव्हाची नानकटाई कशी बनवायची?

५. पवनमुक्तासन

या आसनातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पोटातील वायू निघून जाण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते. पाठीवर झोपून दोन्ही गुडघे पोटावर दाबून घ्यावेत. यामुळे पोटातील वात निघून जाण्यास मदत होते.

Web Title: Belly Fat 5 Mint Easy Yoga To Reduce Fat Fitness Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :yogayogasan