Summer Travel : ट्रिप अशी प्लॅन करा जिथं बच्चेकंपनीलाही येईल मजा,'या' ठिकाणांचा लिस्टमध्ये करा समावेश

Summer Travel : मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मुलांच्या परीक्षा देखील संपतात आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. मग, या सुट्टीमध्ये मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात.
Summer Travel
Summer Travel esakal

Summer Travel : प्रवास करायला तर सगळ्यांनाच आवडते. मग, ते लहान मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती सगळ्यांनाच बाहेर फिरायला जायला आवडते. आता मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मुलांच्या परीक्षा देखील संपतात आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. मग, या सुट्टीमध्ये मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात.

यंदाच्या सुट्टीत तुम्ही देखील बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्ही मुलांसोबत भरपूर मजामस्ती कराल आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद घ्याल. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Summer Travel
Foreign Travel Tips : बजेट-फ्रेंडली फॉरेन ट्रीप करायचीय? मग, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

दार्जिलिंग

दार्जिलिंग हे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये स्थित आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून देश-विदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. लहान मुलांना आनंदी ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. दार्जिलिंगला भेट दिल्यानंतर, दमजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानला भेट द्यायला विसरू नका. हे प्राणी उद्यान मुलांना फार आवडेल यात काही शंका नाही. दार्जिलिंगमधील चहांच्या बागांना अवश्य भेट द्या. (Darjeeling)

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड राज्यात स्थित आहे. हे देशातील लोकप्रिय उद्यानांपैकी एक आहे. या उद्यानामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि पक्षी पहायला मिळतात. हे उद्यान पाहून मुलांना नक्कीच आनंद होऊ शकतो.

त्यांना जर वन्यजीव पाहण्याची आवड असेल तर, मुलांना या ठिकाणी फिरायला नक्की घेऊन जा. यासोबतच तुम्ही ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसारख्या गोष्टींचा ही आनंद घेऊ शकता. शिवाय, या उद्यानामध्ये तुम्ही हत्ती सफाराची ही आनंद घेऊ शकता. (Jim Corbett National Park)

मुन्नार

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना निसर्गाच्या सानिध्यात जरूर घेऊन जायला हवे. यामुळे, मुलांना निसर्गाचे महत्व समजू शकेल आणि त्यांना निसर्गाचा सहवास ही लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने मुलांना जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळू शकेल.

मुन्नार हे ठिकाण केरळमध्ये स्थित असून पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. या मुन्नारचे निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असून तुम्ही येथील तलावामध्ये बोटिंगचा ही आनंद घेऊ शकता. (Munnar)

Summer Travel
Summer Travel Tips: जंगल सफारीचा आनंद होईल द्विगुणित, बॅगेत 'या' गोष्टी नक्की ठेवा सोबत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com