ब्लॅक आऊटफिट ट्राय करताय? लुक हटके दिसण्यासाठी 5 टिप्स

to black matching all are increased your personality look and tips for it in kolhapur
to black matching all are increased your personality look and tips for it in kolhapur

कोल्हापूर : एखाद्या खास कार्यक्रमात जायचं म्हणजे तितकाच खास असा पोषाख आणि इतर गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यातही क्लासी लूक दिसण्यासाठी मग त्या पद्धतीने आउटफिट्स निवडली जातात. अशावेळी ज्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल अशा आउटफिट्सची निवड करते. तसंच रंगाच्या बाबतीत बघायला गेलं तर जो रंग आवडतो त्या रंगाची कपडे आणि मॅचिंग पाहिलं जातं. मात्र तरीही अनेकदा असंही होतं की एखाद्या कार्यक्रमात अनेकजण काळ्या रंगाचे कपडे घालून आलेले असतात.

कोणत्याही वेळी पूर्ण ब्लॅक आउटफिट्स बेस्ट ठरू शकतात. पण त्यात एक अडचण असते ती म्हणजे यात आणखी वेगळेपणा कसा आणायचा. वेगळी अशी स्टाइल कशा प्रकारे दिसेल असा प्रश्न असतो. खरंतर यासाठी फार काही करावं लागत नाही खूप सोप्या टिप्स आहेत.

ब्लॅक आउटफिट्स आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

काळ्या रंगाच्या कपड्यांवर सोन्याचे दागिने उठून दिसतील असं वाटतं. ते खरंही आहे पण याशिवाय इतर पर्यायही तुम्ही वापरू शकता. एखाद्या फंक्शनसाठी जात असाल तर त्यावर स्टेटमेंट ऑक्सिडाइज्ड इअररिंग ट्राय करू शकता. यामुळे तुमचा लूक थोडा हटके दिसेल. गोल्डन इअररिंग्ज ब्लॅक आउटफिट्सवर खूपच भडक दिसू शकतात.

ब्लॅक आणि बेजचं कॉम्बिनेशन

फूल ब्लॅक आऊटफिट ट्राय करत असतील तर त्यासाठी ब्लॅक कोट किंवा ब्लेजर हे छान दिसते. पण त्याऐवजी ब्लॅक आणि बेज रंगाचे कॉम्बिनेशन उठावदार दिसू शकेल. यामध्ये कोट किंवा जॅकेट असेल तर ब्लॅक, बेज उत्तम ठरेल. मात्र यात हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे पूर्ण आउटफिट ब्लॅकच असतील. 

पेन्सिल हिल्स

ब्लॅक आउटफिट्ससोबत बूट आणि पेन्सिल हिल्स उठून दिसतात. तुम्ही कोणत्याही प्रकारची हेअरस्टाइल करा, कोणताही ड्रेस घातलात तरी त्यासोबत पेन्सिल हिल्स चांगले दिसतील. तुम्ही जीन्स, लेगिन्ससोबत पेन्सिल हिल्स ट्राय करू शकता. जर तुम्ही पेन्सिल हिल्स घालून कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही बूट्स निवडू शकता. 

ग्लासेस

ब्लॅक आउटफिट केल्यावर त्यावर उठून दिसतील असे ग्लासेस तर हवेतच. यात तुम्ही पूर्ण ब्लॅक ग्लास निवडू शकता पण त्याची फ्रेम वेगळी असेल याकडे लक्ष द्या. ब्लॅक ग्लासला गोल्डन किंवा सिल्वर फ्रेम असेल तर चांगलंच. रिफ्लेक्टर स्टाइलचे ग्रेडिअंट ग्लास आणखी वेगळे दिसतील.

गोल्डन बेल्ड आणि रेड लिपस्टिक

ब्लॅक ड्रेसवर आणखी एक गोष्ट अॅड करू शकता ती म्हणजे बेल्ट. एखाद्या पार्टीत जात असाल तर ब्लॅक आउटफिटवर गोल्डन बेल्ट पर्याय ठरेल. तसंच रेड शेडची लिपस्टिक तुमच्या सौंदर्यात भर टाकेल. यामुळे तुमचा लूक नक्कीच बोल्ड दिसेल. आणखी एक म्हणजे जर तुम्ही कॉकटेल पार्टीसारख्या ठिकाणी जात असाल तर अशा कॉकटेल ड्रेसवर हिल्स उत्तम पर्याय ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com