Car Care : कार स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यासाठी या टिप्स येतील कामी

जर तुमच्या कुटुंबात लहान मुलं Children असतील तर कार लवकर घाण होवू शकते. यासाठीच जर तुम्ही योग्य नियोजन Planning केलंत तर कार स्वच्छ आणि निटनेटकी राहण्यास मदत होईल
कारची स्वच्छता
कारची स्वच्छताEsakal

कार खरेदी केल्यानंतर मोठं आव्हान असतं ते म्हणजे कार स्वच्छ आणि कायम नीटनेटकी ठेवणं. कार अस्वच्छ असल्यास अनेकदा प्रवास करणं कंटाळवाणं ठरू शकतं. तसंच अस्वच्छतेमुळे कारमध्ये कुबट वास येऊ शकतो. Car Care and Cleaning hacks in Marathi

त्याचप्रमाणे काही वेळेस अस्वच्छतेमुळे कारमध्ये Car उंदीर शिरून काही महत्वाच्या वायर्स कुरतडू शकतात. ज्यामुळे तुमचं मोठं नुकसान होवू शकतं. प्रवास Travel करत असताना प्रसन्न वाटावं यासाठी कार स्वच्छ ठेवणं गरजे आहे. अनेकदा रोजच्या धावपळीमुळे फारसा वेळ न मिळाल्याने कार अस्वच्छ राहते.

खास करून जर तुमच्या कुटुंबात लहान मुलं Children असतील तर कार लवकर घाण होवू शकते. यासाठीच जर तुम्ही योग्य नियोजन Planning केलंत तर कार स्वच्छ आणि निटनेटकी राहण्यास मदत होईल.

काही सोप्या आणि स्वस्त हॅक्स वापरून तुम्हाला कार अगदी स्वच्छ ठेवणं सहज शक्य होईल. या हॅक्स कोणत्या ते जाणून घेऊयात.

कारमधील कचरा वेळेवेळी बाहेर काढा- कारमध्ये कचरा जास्त प्रमाणात साचल्यानंतर एकदाच टाकता येईल हा विचार काढून टाका. त्याएवजी दररोज घर किंवा ऑफिसमध्ये गाडी पार्क करताना गाडीमध्ये असलेला कचरा लगेचच बाहेर काढा. त्याचसोबत वाटेत एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडी दिसल्यास गाडीतील टिश्यू, पेपर ग्लास किंवा टाकाऊ बाटल्या लगेचच कचराकुंडीत टाका.

जर तुम्हाला प्रत्येकवेळी कचरा टाकणं शक्य नसेल तर तुम्ही कारमध्ये एखादा लहान कचरा टाकण्यासाठी बॉक्स ठेवू शकता. घरच्या घरी तुम्ही एखादी कचरापेटी ठेवू शकता.

हे देखिल वाचा-

कारची स्वच्छता
Car Safety Rating : आता अधिक सुरक्षित कार

स्वच्छतेच्या वस्तू- तुमच्या कारच्या सेंट्रल कन्सोलमध्ये किंवा साइड ग्लव्ह बॉक्समध्ये काही मायक्रोफायबर, डिसइंफेक्टिंग वाइपस् अशा काही स्वच्छतेच्या वस्तू ठेवा आणि त्याचसोबत त्याचा वेळेवेळी वापर करा.

फ्लोअरमॅट स्वच्छ ठेवा- फ्लोअर मॅटमध्ये मोठ्या प्रमाणात माती, किंवा रेती आणि इतर कचरा साचून राहत असतो. यासाठी फ्लोअर मॅट वरचेवर स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहेय खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फ्लोअर मॅट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्य़था कारमध्ये दुर्गंधी येऊ शकते.

हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लिनर- कार स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लिनरमध्ये नक्कीच इनव्हेस्ट करू शकता. यामुळे सिट तसचं फ्लोअरमॅट आणि कानाकोपऱ्यात साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ करणं सोप होईल.

सीटची काळजी- जर तुमच्या सीटचे कव्हर चामड्याचे असतील तर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. चामड्याच्या सीट कव्हरला काही काळाने भेगा जाण्याची किंवा ओरखडे पडण्याची शक्यता असते. यासाठीच सीटला दर दोन महिन्यांनी लेदर कंडिशनिंग करा.

यासाठी तुम्ही लेदर कंडिशनिंग वाइपचा वापर करू शकता.

कागदपत्रांसाठी फोल्डर- कारमध्ये एक फोल्डर ठेवा. ज्यामध्ये तुम्ही तुमचे कामाची सर्व कागदपत्रं किंवा बिलं ठेवू शकता. ज्यामुळे ती शोधणं सोप होईल, तसंच गाडीतही कागदपत्रांचा पसारा होणार नाही.

एअरफ्रेशनर- जर तुमची कार स्वच्छ असेल तर कारमध्ये दुर्गंधी येणार नाही. मात्र काही वेळेस कारमध्ये स्वच्छता राखणं शक्य होत नाही. यासाठी कारमध्ये एक चांगलं एअरफ्रेशनर असणं अत्यंत गरजेचं आहे.

अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतल्यास कार कायम स्वच्छ आणि निटनेटकी राहील.

हे देखिल वाचा-

कारची स्वच्छता
Mukesh Ambani New Car: बॉम्ब असूद्या की आग, काहीच फरक पडणार नाही! अंबानींनी घेतली नवी मर्सिडिज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com