Retirement Planning: तर रिटायरमेंट नंतरही महिन्याला ५०-६० हजार रुपये मिळत राहतील

निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या साठीनंतर अनेकदा शरीर साथ देत नाही. किंवा काम करण्यासाठी पूर्वी इतकं बळ शिल्लक राहत नाही. यासाठीच नोकरी लागल्यापासूनच रिटायरमेंट नंतरचं प्लानिंग करणं अत्यंत गरजेचं आहे
तरतूद निवृत्तीनंतरची
तरतूद निवृत्तीनंतरचीEsakal
Updated on

नोकरी करत असताना एक एक वर्ष कसं निघून जातं हे कळतंही नाही. नोकरी करत असताना एकीकडे रोजचा खर्च भागवत, स्वत:ची आणि कुटुंबाची Family स्वप्नं पूर्ण करत असताना दुसरीकडे मात्र रिटायरमेंट नंतरसाठी सेव्हिंग करण्यावर भर असतो. Investment Tips For Retirement Financial Planning

अनेकजण लवकरच रिटायरमेंट Retirement म्हणजेच निवृत्ती नंतरसाठी प्लॅन करणं सुरू करतात. तर काही मात्र नोकरी लागून काही वर्ष उलटून गेल्यानंतर रिटायरमेंट नंतरच प्लानिंग सुरू करतात. अनेकजण तर या गोष्टीकडे गांभिर्याने पाहतच नाही. मात्र योग्य वेळेत रिटायमेंटनंतरच प्लानिंग करणं गरजेंचं आहे.

तुम्ही कितीही पैसा कमावत असलात तरी तो योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या खर्ची करणं, साठवणं किंवा गुंतवणूक Investment करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकजण साधारण ६० ते ८० या वयासाठी म्हणजेच जवळपास २० वर्षांसाठी पैसे साठवण्याची तरतूद करत असतात.

निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या साठीनंतर अनेकदा शरीर साथ देत नाही. किंवा काम करण्यासाठी पूर्वी इतकं बळ शिल्लक राहत नाही. यासाठीच नोकरी लागल्यापासूनच रिटायरमेंट नंतरचं प्लानिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही वेळीच विचारपूर्वक गुंतवणूक केली तर निवृत्ती नंतरही तुम्ही महिन्याला ५०-६० हजार रुपये मिळवू शकता. यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

तरतूद निवृत्तीनंतरची
Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायचीये? मग हे आहेत बेस्ट पर्याय

१. योग्य वेळी करा नियोजन- जर तुम्हाला रिटायरमेंट नंतरचा काळ कोणत्याही चिंतेशिवाय आनंदात घालवायचा असेल तर शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरु करा. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी तुमची नंतरची चिंता कमी होईल.

खास करून नोकरीला लागल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष इतर जबाबदाऱ्या कमी असतात. या काळामध्ये जास्त गुंतवणूक करा. यामुळे तुमचा भविष्यातील आर्थिक ताण कमी होईल.

२. भविष्यातील आर्थिक गरजांचा अंदाज बाधा- निवृत्तीनंतर तुम्हाला तर महिन्याला खर्चाला किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी किती पैसे लागू शकतात याचा अंदाज बांधा. यामुळे तुम्हाला महिन्याला आतापासून किती पैश्यांची बचत करायची आहे किंवा गुंतवणूक करायची आहे हे लक्षात येईल.

३. असं ठरवा गणित- जर तुम्हाला सध्या चार जणांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी साधारण ५०-६० हजार रुपये महिन्याला खर्च करावे लागातात. याचाच अर्थ निवृत्तीनंतर तुम्हाला म्हणजेच पती-पत्नीला दरमहा २५-३० हजारांची आवश्यकता असेल. मात्र हा खर्च सध्याच्या परिस्थितीतील झाला. भविष्यात तुम्हाला खर्चासाठी जास्त रक्कम लागू शकते..

तुम्हाला गुंतणूक करताना भविष्यातील महागाईचा विचार करणं गरजेचं आहे. दरवर्षी महागाई वाढत जाते. समजा तुम्ही ३० वर्षांचे आहात तर तुम्हाला साधारण आणखी ३० वर्षांनी महागाई किती वाढेल याचं गणित मांडावं लागेल.

अर्थात हा तुमचा महिन्याचा खर्च असेल. हे पैसे मुलांची लग्न किंवा व्यवसायासाठी खर्च करू नका. या गोष्टींसाठी तुम्हाला वेगळी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. निवृती नंतरसाठी गुंतवलेला पैसा जर तुम्ही इतर गोष्टींना वापरला तर नंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हे देखिल वाचा-

तरतूद निवृत्तीनंतरची
Investment Tips : उत्पन्न कमी असलं म्हणून काय झालं ? तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश ?

निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे हवे १.५ करोड रुपये

तुम्ही केलेल्या सेव्हिंगवर तुम्हाला निवृत्तीपर्यंत ५ टक्के तरी रिटर्न्स मिळतील. अशात जर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा ६० हजार रुपये हवे असतील. तर तुमच्याकडे ६० वर्षापर्यंत किमान १.५ कोटीं हवेत.

निवृत्तीपर्यंत दीड कोटी साठवण्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करावं लागेल. समजा जर तुमचं वय ३० असताना तुम्ही रिटायरमेंट नंतरच प्लानिंग सुरू करत असाल तर तुम्हाला दीड कोटी साठवण्यासाठी दरमहा ७५०० रुपये गुंतवणूक करावी लागेल.

शिवाय चांगलं व्याज आणि सुरक्षित पर्याय पाहून तुम्हाला ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर तुमचं वय ३०हून अधिक असेल तसचं तुमच्या राहिणानानुसार आणि गरजांनुसार जर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा ६० हजारांहून अधिक रक्कम लागणार असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला दर महिन्याला जास्त गुंतवणूक करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com