पुरुषांमध्ये वाढतायेत स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस, जाणून घ्या कारण...

पुरुषांमध्ये वाढतायेत स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस, जाणून घ्या कारण...

मंगलूरू: लठ्ठपणा, अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन आणि धूम्रपान यांसारख्या गोष्टींमुळे लहान वयात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कस्तुरबा मेडिकल कॉलेज (केएमसी) हॉस्पिटल, मंगळुरु येथील सर्जिकल ऑन्कोलॉजी सल्लागार- डॉक्टर हरीश ई यांनी पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे सांगितले.

त्यांनी सांगितले की, "महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या घटना दुर्मिळ असल्या तरी, आम्ही वर्षातून किमान दोन प्रकरणे पाहत आहोत, जेव्हा पुरुषांच्या स्तनाच्या ऊतीमध्ये कर्करोगाच्या पेशी तयार होतात आणि स्तनाचा कर्करोग पुरुषांवर हल्ला करतो. सुमारे 10 वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोग 50-70 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये दिसत होता, आता तो 40-50 वर्षांच्या व्यक्तिंमध्ये दिसू लागला आहे.” डॉ. हरीश यांनी गेल्या वर्षी केलेल्या एकूण 140 स्तनांच्या कर्करोग शस्त्रक्रियांमध्ये दोन पुरुषांचा समावेश होता.

पुरुषांमध्ये वाढतायेत स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस, जाणून घ्या कारण...
भारतीयांसाठी खुल्या झाल्या 'या' दहा देशांच्या सीमा, काय आहेत अटी?

तथापि, हे प्रमाण असे आहे की, एकूण 100 रूग्णांपैकी 99 रूग्ण महिला आहेत आणि फक्त एक पुरुष आहे. तथापि, यापैकी 60-70% पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे ते कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत आहेत म्हणजे तिसरा किंवा शेवटचा टप्पा. याचे कारण असे की, ''पुरुषांच्या कर्करोगाच्या पेशी स्त्रियांच्या तुलनेत आक्रमकपणे पसरतात आणि अनेकदा गुठळ्या आणि अल्सरसारख्या लक्षणांकडे पुरुष दुर्लक्ष करतात. ही लक्षणे पुढे जाऊन पाठदुखी, कावीळ आणि धाप लागणे या समस्यांत बदलतात. कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास असलेल्या पुरुषांना, स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते,''असे डॉ. हरीश पुढे म्हणाले.

पुरुषांमध्ये वाढतायेत स्तनाच्या कर्करोगाच्या केसेस, जाणून घ्या कारण...
रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी खाल्ल्याने वाढतो लठ्ठपणा!

डॉ. कृतिका मुरुगन, सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल, बेंगळुरू यांनी सांगितले, "पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण एक टक्‍क्‍यांहून कमी असले, तरी त्याची कारणे कमी-अधिक प्रमाणात महिलांच्या स्तनाच्या कर्करोगासारखीच असतात, परंतु त्यासाठी चाचणी करणे महत्त्वाचे ठरते.''

जनुक उत्परिवर्तन, विशेषत: सुप्रसिद्ध बीआरसीए जनुक तसेच, कोरोना साथीपासून आम्ही हे लक्षात घेत आहोत की, ''ट्यूमरचा आकार आणि त्याचा टप्पा पुढचा स्तर गाठतो. रुग्णालयाला विलंबाने दिलेल्या भेटीमुळे ते होते. आम्ही आमच्या रुग्णांमधील कर्करोगाची स्थिती आणि उपचार यावर साथीच्या रोगाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करत आहोत," असंही त्या म्हणाल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com