Chest Pain Symptoms : छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणं लय महागात पडेल? असू शकते गंभीर आजाराची चाहुल!

Chati dukhane upay: छातीत कशामुळे दुखते? घरात एकटे असताना दुखायला लागलं तर काय करायचं
Chest Pain Symptoms in Marathi
Chest Pain Symptoms in Marathi esakal

Chest Pain Symptoms :  काहीही आजार नसेल तरीही कधी कधी छातीत दुखू लागते. तुम्हाला हृदयविकार नसेल तरीदेखील छातीत किंवा हृदयाजवळच्या भागात दुखू शकते. याकडे काही लोक दुर्लक्ष करतात. पित्त झाल्याने छातीत दुखत असेल असा निष्कर्ष काढतात. पण, असं नसतं.

अनेकदा काही लोकांना छातीत दुखल्यासारखे वाटते. अशा स्थितीत काही लोक डॉक्टरांशी संपर्क साधतात, तर काही लोक हे हलके दुखणे समजून दुर्लक्ष करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की छातीत दुखण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

विशेषतः जेव्हा ते पुन्हा पुन्हा होत असते. कारण कधीकधी छातीत तीव्र वेदना हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. परंतु काहीवेळा ते वायूच्या निर्मितीमुळे देखील होते. तथापि, छातीत दुखणे इतर अनेक कारणांमुळे देखील होऊ शकते.

Chest Pain Symptoms in Marathi
Chest Pain : वारंवार छातीत दुखतंय? ही असू शकतात कारणे; वेळीच जाणून घ्या

तुम्हाला छातीत वारंवार दुखत असेल तर त्याला हलके न घेता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, अन्यथा तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. तर, आज आम्ही तुम्हाला छातीत दुखण्याची कारणे काय आहेत हे सांगणार आहोत, तसेच काही घरगुती उपाय जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेदना झाल्यास लगेच आराम मिळू शकतो.

छातीत का दुखते?

लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे छातीत दुखते. कधी ही वेदना सौम्य असते तर कधी तीक्ष्ण असते. जर तुम्हाला वारंवार वेदना होत असतील तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका.

डॉक्टरांच्या मते छातीत दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे

 • हृदयविकाराचा झटका

 • हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा

 • हृदयाच्या स्नायूंना सूज येणे.

 • न्यूमोनिया

 • रक्ताच्या गुठळ्या

 • फुफ्फुसाभोवती सूज

 • पॅनीक अटॅक

 • छातीत जळजळ

 • ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास 

 • ओटीपोटात पेटके

 • जड जेवण घेतल्याने

Chest Pain Symptoms in Marathi
Sagar Karande: अन अचानक छातीत दुखू लागलं.. तब्येतीबाबत सागर कारंडेची मोठी अपडेट

हे हृदयविकाराचे लक्षण देखील असू शकते

जर तुम्हाला शिंकताना किंवा खोकताना छातीत दुखत असेल तर हे छातीत संसर्गामुळे होत आहे हे समजून घ्या. दुसरीकडे, जर तुमच्या छातीच्या डाव्या बाजूला किंवा फुफ्फुसाखाली वेदना सुरू होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

छातीत जळजळ होत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची जळजळ होत असेल तर तुम्हाला अॅसिडची समस्या असू शकते.

छातीत दुखत असल्यास हे उपाय करा

 • तुळशीची पाने चघळल्याने छातीचा हलकासा त्रास बरा होतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहामध्ये तुळशीची पानेही पिऊ शकता. याशिवाय तुळशीचा उष्टा पिण्यानेही तुम्हाला बराच आराम मिळतो.

 • कधीकधी शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे छातीत दुखू लागते. अशा परिस्थितीत मशरूम, दूध, फॅटी फिश इत्यादी व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करा.

 • जर तुम्हाला छातीत जळजळ, वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर तुम्ही लसणाचे सेवन करू शकता. यासाठी प्रथम लसणाचा रस काढा. यानंतर ते एक कप कोमट पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

Chest Pain Symptoms in Marathi
Chest Pain : वारंवार छातीत दुखतंय? ही असू शकतात कारणे; वेळीच जाणून घ्या

छातीत कळ येत असेल तर लगेचच हे करा

 • डावा हात सरळ करून मूठ बांधा. मूठ पालथी होईल असा हात वळवून हात ताठ करा. नंतर, जेथे पंजा संपतो त्या बिंदू पासून कोपरापर्यंत, याचा मध्य बिंदू शोधा. आता त्या बिंदूवर बोटाने/अंगठ्याने किंचित दाब देऊन, तेथे दुखते आहे कां, याचा अंदाज घ्या.

 • जर दुखत असेल तर ३-५ मिनिटे ॲक्युप्रेशर द्या. या बिंदूवर दुखत असल्यास दुखणे हार्ट शी संबंधित आहे, असे समजावे.

 • हार्टशी संबंधित, शंकानिरसनासाठी, चाचण्या करून घ्या. त्या बिंदूवर दुखत नसल्यास, गॅसेसमुळे कळ मारते, असे समजावे.

 • याशिवाय मेडीटेशन करा. याचाही उत्तम फायदा तुम्हाला होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com