
राजू वानोळेने छातीत चाकू खुपसतास अंकुश शेळके गंभीर जखमी झाला. त्याला प्रचंड वेदना होत होत्या.
Nanded Crime : मेहुण्यानं भाऊजीच्या डोळ्यात चटणी टाकून छातीत खुपसला चाकू
किनवट : चाकूने भोसकून भाऊजीचा खून केल्याची घटना किनवट (Kinwat) तालुक्यातील धानोरा येथे गुरुवारी (ता.एक) दुपारी घडली. संशयित मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकुश माधव शेळके (वय २८, रा. पिंपरफोडी) असे मृताचे नाव आहे.
पती-पत्नीच्या भांडणामुळे अंकुश शेळके यांची पत्नी माहेरी धानोरा येथे राहत होती. पत्नीला आणण्यासाठी अंकुश शेळके हा धानोरा येथे गेला होता. समजूत काढल्यानंतर पत्नी सोबत यायलाही तयार झाली. तितक्यात मेहुणा राजू वानोळे (वय १९) हा तेथे आला आणि त्याने विरोध करत अंकुश शेळके यांच्या डोळ्यात चटणी टाकली.
छातीत चाकू खुपसला. यातच अंकुश शेळके याचा मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, निरीक्षक दीपक बोरसे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. संशयित राजू वानोळेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
जीव वाचविण्यासाठी पळत सुटला
राजू वानोळेने छातीत चाकू खुपसतास अंकुश शेळके गंभीर जखमी झाला. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. तशाही स्थितीत जीव वाचविण्यासाठी अंकुश रस्त्याने धावत सुटला. अतिरक्तस्राव होऊन रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.