Chocolate Day 2024 : हटके पद्धीतीने साजरा करा चॉकलेट डे, ट्राय करा या भन्नाट रेसिपीज

होम मेड रेसिपीने ‘चॉकलेट डे’ बनवा स्पेशल...
Chocolate Day 2024 : हटके पद्धीतीने साजरा करा चॉकलेट डे, ट्राय करा या भन्नाट रेसिपीज

फेब्रुवारी महिन्यात येणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ हा सगळ्याच जोडप्यांसाठी खूप खास असतो. हा संपूर्ण आठवडा लोक त्यांच्या जोडीदारांसोबत वेळ घालवतात. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात. जर तुमच्या जोडीदाराला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही त्याच्यासाठी चॉकलेटसह काही डिश तयार करू शकता.

जरी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेट डिशेस मिळतील, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही वेगळ्या गोष्टी घरीच तयार करू शकता. जर तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला सरप्राईज देऊ शकता.

Chocolate Day 2024 : हटके पद्धीतीने साजरा करा चॉकलेट डे, ट्राय करा या भन्नाट रेसिपीज
Chocolate Day 2024 : ‘चॉकलेट डे’ च्या निमित्ताने 'या' खास पद्धतीने जिंका तुमच्या जोडीदाराचे मन

चॉकलेट शेक

तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही घरीच स्वादिष्ट चॉकलेट शेक तयार करू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे आणि त्यात आईस्क्रीम घातल्यास त्याची चव अनेक पटींनी वाढते.

चॉकलेट केक

'चॉकलेट डे'साठी तुम्ही जोडीदारासाठी चॉकलेट केक तयार करू शकता. हे बनवणे नक्कीच थोडे कष्टाचे आहे, पण जेव्हा तुम्ही ते बनवून तुमच्या जोडीदाराला खाऊ घालता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हला खूप छान वाटेल.

हॉट चॉकलेट

लहान मुलांना हॉट चॉकलेट खूप आवडते. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत काही वेळ घालवायचा असेल तर हॉट चॉकलेट बनवा आणि कॉफी डेटप्रमाणे सर्व्ह करा.

चॉकलेट कपकेक

जर तुमच्याकडे केक बनवायला वेळ नसेल तर तुम्ही चॉकलेट कपकेक बनवून तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. आजकाल, मायक्रोवेव्हच्या मदतीने कपकेक 3-5 मिनिटांत तयार केले जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com