Condoms Break Reason: या कारणाने सेक्सदरम्यान फाटू शकतं कंडोम; तुम्ही तर या चुका करत नाही ना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Condoms Break Reason

Condoms Break Reason: या कारणाने सेक्सदरम्यान फाटू शकतं कंडोम; तुम्ही तर या चुका करत नाही ना?

Comdom Break Reasons: अनेकदा शारीरिक संबंधादरम्यान कंडोम फाटल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. कंडोम नको असलेली प्रेग्नेंसी आणि सेक्शुअल ट्रांसमिशन डिसीज रोखण्यासाठी उत्तम साधन मानलं जातं. त्यामुळे निश्चितच कंडोम फाटण्याची रिस्क तुम्ही घेणार नाही. तेव्हा तुमच्या कोणत्या चुका कंडोम फाटण्यास आणि कट जाण्यास कारणीभूत ठरतात ते जाणून घेऊया.

या चुकांमुळे शारीरिक संबंधादरम्यान फाटू शकतं कंडोम

१. थंड ठिकाणी उन्हात कंडोम ठेवणे

ज्या ठिकाणी ऊन असेल अशा ठिकाणी चुकूनही कंडोम ठेवू नका. कंडोम कायम अंधाऱ्या किंवा थंड जागी ठेवा. मात्र फ्रिजमध्ये चुकूनही कंडोम ठेवू नका. असं केल्याने कंडोमचं नुकसान होऊ शकतं.

२. डबल लेअर करणं

अधिक सुरक्षा मिळावी म्हणून काही जण कंडोमच्या दोन लेअर वापरतात. मात्र कंडोम एका विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेलं आहे. त्यामुळे ते सिंगल पिसमध्ये वापरलं जावं. जर एकावेळी दोन कंडोमचा वापर केलात तर फ्रिक्शनमुळे ते डॅमेज होऊन फाटण्याची शक्यता असते.

३. योग्य पद्धतीने वापर न करणे

जर तुम्ही पहिल्यांदा कंडोमचा वापर करत असाल तर तुम्ही त्याच्या वापराची योग्य पद्धत शिकली पाहिजे. जर तुम्ही त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर सेक्सदरम्यान कंडोम डॅमेज होण्याची शक्यता आहे. परिणामी तुम्ही ज्या सुरक्षेची अपेक्षा ठेवाल ती सुरक्षाही तुम्हाला मिळणार नाही.

हेही वाचा: Physical Relation Ban: या देशात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी; पर्यटक भडकले कारण...

४. स्वस्त कंडोम खरेदी करू नये

शारीरिक संबंध ठेवताना ते कंडोम तुम्हाला फिट बसेल असेच कंडोम वापरा. जर कंडोमची साईज जास्त छोटी झाली तर सेक्सदरम्यान ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वस्त कंडोम खरेदी करू नका. जे तुम्हाला सुरक्षित हमी देतात असाच कंडोम वापरा.