काँडम कंपनीकडून रणबीर आलियाला खास शुभेच्छा; म्हणाले 'आमच्याशिवाय..' | Condom brand wishes Ranbir Kapoor- Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

durex posted funny wishing for alia and ranbir

काँडम कंपनीकडून रणबीर आलियाला खास शुभेच्छा; म्हणाले 'आमच्याशिवाय..'

Ranbir Alia Wedding : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट (alia bhatt ) यांचे लग्न १४ एप्रिल रोजी रणबीरच्या पाली हिल येथील वास्तू या निवासस्थानी पार पडले. या लग्नाची बरीच चर्चा होती पण अखेर दोघांनीही लग्नगाठ बांधल्याने या चर्चा हात थांबल्या आहेत. सध्या या लग्नाचे फोटो सर्वत्र व्हायरल होत असून बॉलिवूड मधील सेलिब्रिटी, चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण एक खास शुभेच्छा रणबीर आलिया ला मिळाल्या आहे. एका काँडम कंपनीने या नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या असून एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा: कहर झाला !! कलकत्त्यात रणबीर आलियाचे पुतळे करून लावलं लग्न...

आलिया आणि रणबीरमध्ये गेले अनेक वर्षांची मैत्री होती. २०१५ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण सोनम कपूरच्या लग्नात दोघेही उघडपणे मीडियासमोर आले. आणि तेव्हापासून यांच्या रेलशनशिपच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु झाल्या. आणि अखेर हे दोघे सप्तपदी घेऊन एकमेकांचे जीवनसाथी बनले. त्यांनतर सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा, कतरीना यासांरख्या अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका काँडम कंपनीने म्हणजे 'ड्युरेक्स' (durex) या कंपनीने दिलेल्या शुभेच्छा सर्वांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत.

हेही वाचा: अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, म्हणाली...

'ड्युरेक्स'च्या पोस्ट आणि त्यांचे सोशल मीडिया कॅम्पेन हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांच्यातील समय तत्परता त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. रणबीर आलियाच्या लग्नावर एक खास पोस्ट त्यांनी लिहिली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या ‘चन्ना मेरेया’ या गाण्याचा वापर केला आहे. ‘डियर रणबीर आणि आलिया, महफिल में तेरी हम ना रहे जो, फन तो नहीं है,’ अशी पोस्ट त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या पोस्टची भरलीच चर्चा रंगली अजून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्ट मध्ये रणबीर आणि आलियाला टॅग केल्याने आता ते यावर काही प्रतिक्रिया देणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. (durex posted funny wishing for alia and ranbir)

Web Title: Condom Brand Wishes Ranbir Kapoor Alia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..