कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
Summary

सुरुवातीला कडक लॉकडाऊन असताना व्यसनाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नंतर निर्बंध शिथिल झाल्यावर या प्रमाणात प्रचंड वाढ झालीय.

कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले. त्यात अनेकजण मानसिक तणावाखाली आले आहे. त्यामुळे तणाव घालवण्यासाठी अनेकजण व्यसनाकडे वळल्याचे चित्र दिसून आले. सुरुवातीला कडक लॉकडाऊन असताना व्यसनाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, नंतर निर्बंध शिथिल झाल्यावर या प्रमाणात प्रचंड वाढ झालीय.

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
मुलांना मोबाईलचं व्यसन तर नाही ना?

माणसाला घरामध्ये बसण्याची सवय नाही. नोकरी, व्यवसायानिमित्त तो घराबाहेर राहतो. पण, कोरोनाने अनेकांना घरामध्ये बसायला भाग पाडले. अनेक कंपन्यांनी वर्कफ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. घरामध्ये बसून काम करण्याचे अनेकजण प्रयत्न करत होते. त्यामुळे या काळात अनेकांनी विरंगुळा म्हणूनही व्यसनास सुरवात केल्याचे पाहायला मिळाले.

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
सोशल मीडियाचं व्यसन

कुटुंबामधील कलह अनुकूल वातावरण

घरात एकत्र आल्यानंतर चिडचिड होणे. कुटुंबामधील कलह वाढणे. कामाचा ताण वाढणे. अर्थात बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या व्यसनात वाढ होऊ लागली. छोट्या कुटुंबात तर सतत तणावग्रस्त परिस्थिती होती. कामावरून चिडचिडपणा वाढत होता. यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होऊन पोलिसांपर्यंत पोहचले. दरम्यानच्या काळात अनेक समस्या घेऊन नागरिक जीवन जगत होते. अर्थात, ताणतणाव घालविण्यासाठी अनेकांनी व्यसनाचा मार्ग पत्करल्याची माहिती पुढे आली. लॉकडाऊन काळात गृहकलह, महिलांवरील अन्याय, पुरुषांना होणारा मानसिक त्रास अशा अनेक तक्रारी पाहायला मिळाल्या. ऑफिस आणि घर यामध्ये साहजिकच फरक आहे. ऑफिसचे काम अचानक घरामधून करावे लागल्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागले. ऑफिसमधील व्यवस्था घरी नसल्यामुळे आहे, त्या परिस्थितीत काम केले जात होते. शिवाय, कामाच्या वेळा वाढल्यामुळे कंबरदुखी, डोकेदुखी, डोळ्यांचे त्रास सुरू झाले. यापलीकडेही कामाचा ताण तर होताच. यामुळे चिडचीड होण्याचे प्रमाण वाढले.

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडवायचंय का? मग हे वाचा

डिसेंबर 2020 मध्ये एका संस्थेने (इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये ग्रॉसमॅन) केलेल्या अभ्यासात 45.7 टक्के प्रकरणांमध्ये मद्यपान वाढण्याचे कारण तणाव होते. अल्कोहोलची उपलब्धता 34.4 टक्के वाढली होती. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत गेले, तसतसे अनेकांनी अधिक प्रमाणात मद्यपान करण्यास सुरुवात केली. तणावात असताना अनेकजण दारूचे सेवन जास्त प्रमाणात करतात, ही सर्वमान्य गोष्ट आहे. ब्रिटिश लिव्हर ट्रस्टच्या मते, अल्कोहोलचा गैरवापर इतका वाढला आहे की त्यांच्या हेल्पलाईनवर कॉलमध्ये 500 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ! 

- देशात सुमारे 16 कोटी लोक करतात दारूचे सेवन

- दारूच्या वापराचे सर्वाधिक प्रमाण छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोव्यात

- अर्ध्याहून अधिक पुरुष लोकसंख्या छत्तीसगढ, त्रिपुरा आणि पंजाबमध्ये अल्कोहोल करतात सेवन

- पंजाब (6 टक्के), पश्चिम बंगाल (3.9 टक्के) आणि महाराष्ट्र (3.8 टक्के) राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट अल्कोहोलचे सेवन

- अल्कोहोल वापरणारे बहुसंख्य पुरुष (सुमारे 95 टक्के)

- 18-49 वर्षे 74 टक्के लोक करतात अल्कोहोलचे सेवन

- अल्कोहोल सेवन करणारे लोक सामाजिक-आर्थिक वर्गांमध्ये समान रीतीने वितरीत

कोरोना व्हायरस! लॉकडाऊनमुळे वाढले व्यसनाचे प्रमाण
तंबाखूचे व्यसन सोडायचे आहे, मग ही बातमी नक्की बाचा! असे सुटू शकते तंबाखूचे व्यसन

ज्यावेळी कोरोनामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी व्यसनाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. परंतु, जसजसे व्यसनाची साधने उपलब्ध होऊ लागली. तसे, पुन्हा मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढत असल्याचे समोर आले आहे.

- डॉ. मुक्ता पुणतांबेकर.

(सोमनाथ गिते- या लेखाचे लेखक व्यसनमुक्तीचे विषयाचे अभ्यासक आहेत. मोबाईल : 9970387038, ई-मेल : somnath.gite@esakal.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com