डिलिव्हरी बॉय बन गया Gentleman! सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न झालं पूर्ण

झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत तरुणाईसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.
Zomato Delivery Boy
Zomato Delivery Boy Sakal

एखाद्याने आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवलं, तर मग ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणाऱ्यांना कधीही हार पत्करावी लागत नाही. Zomato कंपनीमध्येही डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुणानेही सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिले होते आणि त्याचे हे स्वप्न पूर्णही झालं आहे.  

कित्येक अडचणींवर मात करत या पठ्ठ्या तामिळनाडू लोक सेवा आयोगाची परीक्षेच चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे. जाणून घेऊया चर्चेत असलेली या झोमॅटो डिलिव्हरी बॉयची यशोगाथा  

Zomato Delivery Boy
Success Story :  पोरीनं नाव काढलं! सफाई कामगाराची मुलगी होणार डॉक्टर, वाचा तिची थक्क करणारी यशोगाथा  

झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय बनला सरकारी अधिकारी

Zomato ने ट्विटरद्वारे आपल्या डिलिव्हरी बॉयची यशोगाथा शेअर केली आहे. लोक त्याचे खूप कौतुकही करत आहेत. या डिलिव्हरी बॉयचं नाव विघ्नेश असे आहे. फूड डिलिव्हर करून तो आपला उदारनिर्वाह करत होता.

Zomato Delivery Boy
Zomato Delivery Boy Twitter

सोबतच सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही तो मेहनत घेत होता. याकरिता तो लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. दरम्यान १२ जुलै रोजी तमिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

Zomato Delivery Boy
Generic Aadhaar Success Story : मराठी उद्योजकाची यशोगाथा! स्वस्तात औषधं विकून पठ्ठ्याने उभारली 500 कोटींची कंपनी

ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यानं तरूणवर्गासमोर एक आदर्श ठेवला आहे. Zomato ने विघ्नेशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबासह दिसत आहे.

Zomato Delivery Boy
Business Success : कुटुंब संस्कारातून संसाराची घडी अन्‌ व्यवसायात भरारी! नवलखा परिवाराची यशोगाथा

सोशल मीडिया युजर्सकडूनही कौतुकाचा वर्षाव

झोमॅटोने विघ्नेशचा फोटो ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत असताना तमिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विघ्नेशसाठी लाइक या पर्यायावर क्लिक करा."

या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्संनीही प्रतिक्रिया देत विघ्नेशचे अभिनंदन केले आहे. एका यूजरने लिहिलंय की "अभिनंदन, परिश्रमाचे फळ अमृतापेक्षाही गोड असते”. तर आणखी एका युजरने म्हटलंय की, “विघ्नेशने केलेले प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळतेच हे यावरून सिद्ध होते”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com