Dhanteras Rangoli 2025: धनत्रयोदशीच्या सायंकाळी पूजेच्या वेळी घरासमोर ही रांगोळी काढा; मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

Dhanteras 2025 Rangoli Designs: धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे. या दिवशी सायंकाळी पूजेपूर्वी अंगणात सुंदर आणि आकर्षक रंगीबेरंगी रांगोळी काढा आणि मिळवा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवा
Dhanteras 2025 Rangoli Designs

Dhanteras 2025 Rangoli Designs

Esakal

Updated on

Dhanteras 2025 Rangoli Designs: धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो. या दिवशी आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते, तसेच समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मी देवीचं स्वागतही केले जाते. यंदा धनत्रयोदशी हे १८ ऑक्टोबर, शनिवार रोजी आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ७:१६ ते ८:२० दरम्यान आहे.

पूजेच्या अगोदर, घरासमोर रंगीबेरंगी, सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. रांगोळी ही केवळ सजावट नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करणारे एक पारंपरिक माध्यम आहे.

त्यामुळेच, यंदा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धनत्रयोदशीसाठी खास रांगोळी डिझाइन्स. या सोप्या डिझाइन्स पाहून तुम्हीही सहज सुंदर रांगोळी काढू शकता आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवू शकता.

Dhanteras 2025 Rangoli Designs
Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राशीनुसार 'हे' उपाय करा, घरात भरभराट होईल!
Dhanteras Rangoli 2025

Dhanteras Rangoli 2025

Esakal

सर्वप्रथम रांगोळी काढण्याआधी पेन्सिलने कमळ, कलश, आणि त्याच्या सभोवती गोलाकार आकृती रेखाटून घ्या. यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात विविध रंग भरावे. कलश्याच्या वरती पिवळ्या रंगाने नाण्यांची रचना तयार करा. जी समृद्धीच प्रतीक मानली जाते. कलशच्या बाजूला "धनतेरस" असे सुंदर अक्षरात लिहा, ज्यामुळे रांगोळी अधिक उठून दिसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com