Physical Relation In Diabetes: मधुमेह असल्यास शारीरिक संबंध ठेवावे की नाही? तज्ज्ञांचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Physical Relation In Diabetes

Physical Relation In Diabetes: मधुमेह असल्यास शारीरिक संबंध ठेवावे की नाही? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Side Effects Of Diabetes: भारतात लोकसंख्येचा मोठाला मधुमेहाच्या त्रासाने ग्रासले आहे. तुमची जीवनशैली, तुमचा आहार आणि बऱ्याच गोष्टीसुद्धा या आजाराला कारणीभूत आहेत. आरोग्यासंदर्भात आपल्याला ज्या काही समस्या असतात त्या आपण तज्ज्ञांचा सल्ला घेत सोडवतो. मधुमेहाच्या आजारात शारीरिक संबंध ठेवावे की नाही असेही प्रश्न अनेकांना पडलेतच. जाणून घेऊया यावर तज्ज्ञांचं काय मत आहे ते.

शारीरिक संबंधांमुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो रक्तदाबही कमी होतो. मात्र जर तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास असेल तर शारीरिक संबंध ठेवणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक संबंधांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

जर्नल ऑफ डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित 2010 च्या अहवालानुसार, 50 टक्के पुरुष आणि 19 टक्के महिलांनी मधुमेह असूनही त्यांच्या लैंगिक जीवनातील समस्या डॉक्टरांना सांगितल्या नाहीत. असे केल्यास तुमच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. डॉक्टरांना या प्रकरणाची सत्यता सांगा, जेणेकरून तुमच्यावर योग्य वेळी उपचार होऊ शकतील.

मधुमेहामध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या

मधुमेही रुग्णांचे शरीर कमकुवत असते, त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान त्यांना ताठरतेमध्ये समस्या येतात. पण हे सामान्य आहे. ताठरपणाची समस्या दूर करण्यासाठी, आपल्या आहाराकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे. संशोधनानुसार, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या 20 ते 75 टक्के पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये सामान्य पुरुषांपेक्षा दोन ते तीन पट अधिक इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. त्याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर होतो.

या काही टीप्स वापरून तुम्ही तुमचं लैंगिक जीवन सुधारू शकता

स्त्रियांनी मासिक पाळीच्या आधी आणि नंतर रक्तातील साखर तपासली पाहिजे. पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या असणे खूप सामान्य आहे. या समस्येत डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्वतः नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. डायबिटीज आणि डिप्रेशन मिळून तुमचे सेक्स लाईफ खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत, नैराश्य टाळण्यासाठी, स्वतःला व्यस्त ठेवा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. यासोबतच असे लोक मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेऊ शकतात.