Bhau Beej Gifts: बहिणीला द्या खास गिफ्ट, पहा एकापेक्षा एक भारी भेटवस्तूंची लिस्ट

तुम्हालाही या वर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच.
Bhau Beej Gifts
Bhau Beej Giftssakal

दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. भाऊबीज हा भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा सण असतो. बहिण भावाला समर्पित असणारा हा सण असतो. 

या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. तुम्हालाही या वर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच. (Bhau Beej Gifts)

Bhau Beej Gifts
Diwali Gift Idea: दिवाळीत नाही तर दिवाळीनंतरही हे गिफ्ट्स एकदम बेस्ट, तेही डिस्काऊंटमध्ये

बहिणीला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या.

मेकअप किट 

जर तुमच्या बहिणीला मेकअपची आवड असेल तर तुम्ही तिला मेकअप किट देऊ शकता. बहूदा मुलींना मेकअपची आवड असते. मेकअप किट देताना तिचा आवडता प्रोडक्ट किंवा ब्रँड कोणता, हे जाणून घ्या.

ज्वेलरी

जर तुमच्या बहिणीला ज्वेलरी आवडत असेल तर तुम्ही भाऊबीजेला तिला ज्वेलरी गिफ्ट करू शकता. ज्वेलरीमध्ये बरेच ऑप्शन असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार गिफ्ट करू शकता.

Bhau Beej Gifts
Astrology: या पाच राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही

कपडे

मुलींना कपडयांची खूप आवड असते. त्यामुळे त्यांच्या आवडत्या रंगाचा ड्रेस किंवा साडीही तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. शिवाय सध्या ट्रेन्ड्स मध्ये असलेले ड्रेसही तुम्ही तिला गिफ्ट करू शकता.

वॉलेट

प्रत्येक मुलीच्या बॅगमध्ये वॉलेट असते. त्यामुळे या भाऊबीजेला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करुन तुम्ही तिला खूश करू शकता.

Bhau Beej Gifts
Diwali Bhaubeej 2020 : आज पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार

सबस्क्रिप्शन

जर तुमची बहिण ओटीटी प्लॅटफॉर्मची फॅन असेल तर तुम्ही तिला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

हेडफोन्स

जर तुमच्या बहिणीकडे हेडफोन्स नसतील तर तुम्ही या भाऊबीजेला तुमच्या बहिणीला आवडत्या कंपनीचे हेडफोन्सही गिफ्ट देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com