Holi Festival | भांग प्यायल्यानंतर हे पदार्थ टाळा; नाहीतर होळीच्या रंगाचा होईल बेरंग do not eat these food after drinking bhaang with thandai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Festival

Holi Festival : भांग प्यायल्यानंतर हे पदार्थ टाळा; नाहीतर होळीच्या रंगाचा होईल बेरंग

मुंबई : होळीला आता फारसा वेळ उरलेला नाही. होळी येण्यापूर्वी आपण होळीची तयारी सुरू करतो. होळीच्या दिवशी अनेकजण भांग पितात. पण ही भांग जास्त झाली तर रंगाचा बेरंग होतो.

त्यामुळे भांग जास्त चढू द्यायची नसेल तर ती प्यायल्यानंतर काही पदार्थांपासून जरा लांबच राहा. (do not eat these food after drinking bhaang with thandai ) हेही वाचा - तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भांगसह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलावी लागेल.

भांगसह दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते. तसेच तुम्हाला लूज मोशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

रिकाम्या पोटी खाऊ नका

बरेच लोक रिकाम्या पोटी भांगचे सेवन करतात. तुम्हीही हे करत असाल तर आत्ताच ही सवय बदला. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक सिद्ध होऊ शकते.

स्निग्ध पदार्थ

तुम्हीही स्निग्ध पदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा. बर्गर पिझ्झासोबत बरेच लोक स्निग्ध पदार्थांचे सेवन करतात. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.या गोष्टींचे सेवन केल्यास धुंदी खूप वाढते.

यामुळे तुम्हाला उलटीसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

होळीच्या दिवशी मजा-मस्ती करावीशी वाटणं स्वाभाविक आहे. पण हे करताना थोडंसं भानही राखावं लागतं. भांगशिवायही थंडाई पिता येते. भांग प्यायल्यानंतरही वर सांगितलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

हे पदार्थ तुमची भांगची धुंदी वाढवतील. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. त्यामुळे भांग प्यायचीच असेल तर वर सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या.

टॅग्स :HoliliquorAlcohol