Spectacles Cleaning: चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत, कोणत्याही कापडाने पुसू नका चष्म्याची काच

How to clean glasses: तुम्ही सतत घालत असलेला चष्मा योग्य प्रकारे स्वच्छ करणं गरजेच आहे. अनेक लोक घातलेल्या कपड्याने किंवा टॉवेल, दुपट्टा हाताला जे कापड मिळेल त्याने चष्मा स्वच्छ करतात. मात्र ही अगदी चुकीची पद्धत आहे
how to clean glasses
how to clean glassesEsakal
Updated on

How to Clean Glasses: मोबाईल टीव्ही आणि कम्प्युटर तसेच लॅपटॉप Laptop यामुळे अलीकडे स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. स्क्रीन टाईम Screen Time वाढल्याने अनेकांना डोळ्यावर चष्मा Spectacles घालण्याची वेळ येत आहे.

चष्मा म्हटलं की त्याची सतत काळजी घ्यावी लागते. खास करून ज्यांना मोठा नंबरचा चष्मा आहे त्यांना चष्म्या शिवाय एखादं काम करणं शक्य होत नाही. Dont clean your spectacles with ordinary cloth

अशांना तर कायम सोबत चष्मा Spectacles बाळगणं आणि त्याचा सांभाळ करणं मोठं जिकिरीचं काम असतं. सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम Sweat यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरियाBacteria जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच चष्मा वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकच गरजेचे आहे. 

तुम्ही सतत घालत असलेला चष्मा योग्य प्रकारे स्वच्छ करणं गरजेच आहे. अनेक लोक घातलेल्या कपड्याने किंवा टॉवेल, दुपट्टा हाताला जे कापड मिळेल त्याने चष्मा स्वच्छ करतात.

मात्र ही अगदी चुकीची पद्धत आहे. यामुळे चष्म्याच्या काचेवर स्क्रॅच पडू शकतात. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला चष्म्याला योग्यरीत्या स्वच्छ करण्याची पद्धत सांगणार आहोत. 

अशी घ्या चष्म्याची काळजी

चष्मा स्वच्छ करण्यासाठी क्लिनर असणं गरजेचं नाही यासाठी साधं पाणी देखील पुरेसं आहे तुम्ही थेट चष्मा नळाखाली पकडून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकावे. त्यानंतर हलक्या हाताने चष्म्याच्या काचा आणि त्याच्या आजूबाजूची फ्रेम स्वच्छ करावी.

त्यामुळे चष्म्यावरील डाग, चिकटपणा आणि बॅक्टेरिया निघून जाईल. त्यानंतर चष्म्या सोबत मिळालेल्या छोट्या कापडानेच कायम तो स्वच्छ कोरडा पुसावा यासाठी इतर कोणतही कापड वापरू नये. 

चष्मा स्वच्छ करण्यासाठी ट्यूश्यु पेपर, टॉवेल, हात रुमाल किंवा ओढणीचा वापर करू नये. तसचं काहीजण नेलपेंट रुमुव्हरचा वापर चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरतात मात्र यामुळे चष्म्याची काच खराब होवू शकते. 

हे देखिल वाचा-

how to clean glasses
Spectacle Mark: चष्म्याचे वळ नाकावर पडल्याने लूक बिघडतोय? ट्राय करा या टिप्स...

तर काहीजण तोंडाची वाफ चष्म्याच्या काचेवर मारुन ती स्वच्छ करतात. यामुळे तर जर्म्स आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. 

चष्म्याला कायमच देण्यात आलेल्या बॉक्स कव्हरमध्ये ठेवावं. यामुळे तो सुरक्षित राहतो. तसचं दररोज घालण्यापूर्वी चष्मा स्वच्छ करण्याची काळजी घ्या. 

चष्मा स्वच्छ करताना केवळ काचा किंवा लेन्स स्वच्छ न करता. संपूर्ण पणे तो स्वच्छ करावा. 

अधून मधून किंवा तुम्ही बाहेरून आल्यावर चष्मा सॅनिटाइज करणं गरजेचं आहे. मात्र हे करत असताना चष्म्यावर सॅनिटाइजर टाकून ठेवू नका. सॅनिटायजर लावून चष्मा लगेचच कोरडा पूसा नाहितर लेन्सवर डाग राहण्याची शक्यता असते. a

how to clean glasses
How to Clean Glasses : चष्मा स्वच्छ असेल तरच होईल खऱ्या-खोट्याची ओळख; या टिप्सनी करा Specs चकचकीत!

चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचे काही थेंब बोटांवर घेऊन हलक्या हाताने लेन्स स्वच्छ करा. त्यानंतर मायक्रोफायबरचं कापडं किंवा चष्म्याचा रुमाल थोडा ओला करून चष्मा स्वच्छ पुसा. 

चष्मा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे लेन्सवरील कोटिंग खराब होवू शकते. 

अशा प्रकारे आपल्या डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा तुमच्या डोळ्यांसाठी नियमित वापरत असलेला चष्मा दररोज स्वच्छ करणं गरजेचं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com