Yoga Tips : शीर्षासन करण्याची भीती वाटतेय ? हे नियम पाळा आणि दुखापत टाळा

हेडस्टँडच्या सरावाने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतोच शिवाय यामुळे चिंता आणि तणावापासूनही आराम मिळतो.
shirshasan
shirshasansakal

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आपण सर्वजण योगासनांची मदत घेतो. मात्र, योगाभ्यास करताना त्याचा योग्य सराव होणे गरजेचे आहे. अनेक योगासने अगदी सोपी आहेत आणि ती स्वतः सहज करता येतात. त्याचबरोबर काही योगासने किचकट असतात आणि अशावेळी ती करताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.

जर या योगासनांचा नीट सराव केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागू शकतात. शीर्षासन हे या आसनांपैकी एक आहे. हे खूप फायदेशीर आसन मानले गेले आहे. (dos and don'ts of headstand shirshasan)

हेडस्टँडच्या सरावाने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतोच शिवाय यामुळे चिंता आणि तणावापासूनही आराम मिळतो. हे आसन तुमच्या शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते. पण त्याचा सराव करताना तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

shirshasan
Women Life : काही महिलांना दाढी-मिशी का येते ? चेहऱ्यावरचे हे केस घालवायचे कसे ?

पहिल्या दिवशीच सराव करू नका

कठीण आसनांमध्ये शीर्षासनाची गणना केली जाते. म्हणूनच जेव्हा तुम्ही नियमितपणे योगासने कर असता आणि तुमचे शरीर थोडे लवचीक झालेले असते तेव्हाच या आसनाचा सराव करा.

काही लोक पहिल्याच दिवशी इतरांना पाहून या आसनाचा सराव सुरू करतात, त्यामुळे पडण्याची आणि दुखापत होण्याची शक्यता वाढते.

तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास हेडस्टँड करू नका

हेडस्टँडचा सराव प्रत्येकासाठी खूप चांगला मानला जातो. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत तुम्ही ते करणे टाळावे. उदाहरणार्थ, जर एखाद्याला सर्वायकल किंवा मायग्रेनची समस्या असेल तर तुम्ही या आसनाचा सराव करणे टाळावे.

योग्य दाब असावा

जेव्हा तुम्ही शीर्षासनाचा सराव करता तेव्हा तुम्ही त्याच्या दाबाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, या आसनाच्या सरावाच्या वेळी कोपर आणि डोके दोन्हीमधून जो त्रिकोण तयार होतो, त्यावर योग्य दाब असावा.

तुमच्या कोपरावर योग्य दाब नसल्यास तुमचा तोल जाऊन मानेला दुखापत होऊ शकते.

गरोदरपणात तज्ज्ञांची मदत घ्या

गर्भधारणेदरम्यान हेडस्टँडचा सराव खूप फायदेशीर मानला जातो. प्रेग्नेंसी पीरियडमध्ये अनेक सेलेब्सच्या आईसुद्धा हेडस्टँड करताना दिसल्या आहेत.

परंतु जेव्हा तुम्ही या अवस्थेत हे आसन करता तेव्हा ते नेहमी तज्ञांच्या देखरेखीखाली करा.

हे आसन कधीही एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नका. या स्थितीत, थोडासा धक्का देखील तुम्हाला आणि तुमच्या बाळाला हानी पोहोचवू शकतो. तसेच, प्रत्येक स्त्रीचा गर्भधारणा कालावधी वेगळा असतो, त्यामुळे हे आसन प्रत्येक स्त्रीसाठी योग्य नाही.

shirshasan
Women Life : डोक्यावरचा एक-एक केस उपटून टाकतात महिला नागा साधू

श्वासावर लक्ष द्या

शीर्षासन करताना श्वासोच्छवासाची काळजी घ्यावी. जेव्हा तुमचा श्वास पूर्णपणे सामान्य असेल, तेव्हाच तुम्ही दीर्घ श्वास घेऊन या आसनाचा सराव सुरू कराल.

दुसरीकडे, जर तुमच्या श्वासोच्छवासात अडथळा येत असेल तर तुम्ही हे आसन करू नये. या काळात तुम्हाला स्वतःचे संतुलन राखणे कठीण होईल.

आसन सोडताना काळजी घ्या

अनेकवेळा आपण शीर्षासनाचा नीट सराव करतो, पण परत येताना त्यात गडबड होते. अनेकदा आपण एका झटक्यात दोन्ही पाय खाली आणतो. त्याऐवजी, एक-एक पाय खाली आणून हळूहळू या आसनातून बाहेर यावे.

त्यामुळे आता तुम्हीही शीर्षासन करताना या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com