कोट्यवधींची संपत्ती दान करणारे डॉ. अरविंद कुमार गोयल कोण आहेत ?

कोट्यवधींची संपत्ती दान केल्यानंतरही गर्व नसलेला आणि शेकडो वृद्ध मातांचा मानसपुत्र...
UP businessman Dr Arvind goyal
UP businessman Dr Arvind goyal esakal

सुमारे 600 कोटींची एकूण संपत्ती दान केल्यानंतर, मुरादाबाद (यूपी) उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांना या आधुनिक काळातील देवदूत म्हटले जात आहे. त्यांनी त्यांच्या मालमत्तेतून फक्त त्यांचे मुरादाबाद सिव्हिल लाइन्समध्ये 50 वर्षांच्या मेहनतीतून बांधलेले घर त्यांच्याकडे ठेवले आहे. बाकी सर्व संपत्ती गरिबांना दान दिली आहे. कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या या दानशूर व्यक्तीच्या साध्या सरळ आयुष्याचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

हा दानशूर माणूस बाहेर फिरायला आपली जुनीच स्कूटर वापरतो. गोयल यांच्या उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 100 हून अधिक शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि रुग्णालय आहे .

लोकांची सेवा करणारे डॉ. गोयल हे त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे महान दानशूर म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला गोयल यांच्याकडे 225 शाळा होत्या. पण आता कोरोनाच्या काळानंतर 150 शाळा शिल्लक राहिल्या आहेत. कोरोनाच्या काळात हजारो गरिबांना मदत केल्यामुळे इतर शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

वृद्धाश्रमातील सगळ्या वृद्ध महिला या डॉ.गोयल यांना आपला मुलगाच समजतात. कारण ते या सगळ्या वृद्ध स्त्रियांसोबत आपल्या आईसारखेच वागतात आणि वेळोवेळी त्यांची प्रेमाने, आपुलकीने विचारपूस करतात. आजारपणात सेवा करतात. त्यामुळे या सर्व महिला त्यांना आपला मुलगाच मानतात. ज्याप्रकारे ते या वृद्ध स्त्रियांची मुलगा म्हणून सेवा करतात, तशी सेवा पोटचा मुलगा देखील करु शकणार नाही.

UP businessman Dr Arvind goyal
विविध सेवाभावी संस्था ठरल्या देवदूत ....

ज्याप्रकारे ते या वृद्ध स्त्रियांची मुलगा म्हणून सेवा करतात, तशी सेवा पोटचा मुलगा देखील करु शकणार नाही. अनेक तरुण डॉ.गोयल यांना आपला आर्दश मानतात. डॉ.गोयल यांना रस्त्यावर जर कोणी गरीब बांधव दिसले तर ते त्याला मोकळेपणाने मदत करतात.श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सेवा केलेल्या असंख्य लोकांचे किस्से सांगताना डॉ.गोयल हे थकत नाही.

आतापर्यंत अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या सेलिब्रिटींनी देखील अरविंद गोयल यांचा गुणगौरव केला आहे.डॉ. गोयल हे केवळ समाजसेवाच करत नाहीत तर प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्यांच्यातील या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक तरुण त्यांना आपला आदर्श देखील मानतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com