Relationship Tips: ...यामुळे मुलं करतात लग्न करायला टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

relationship tips

...यामुळे मुलं करतात लग्न करायला टाळाटाळ

अनेक पुरुष रिलेशनशिप मध्ये राहू इच्छितात पण जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा शक्यतो टाळाटाळ करतात. जरी त्यांना आयुष्यात प्रेम आणि एका चांगल्या जीवनसाथीची गरज असते तरी सुद्धा कधी कधी इच्छा नसतानाही ते सिंगल लाइफ जगण्यास तयार होतात. आज आम्ही तुम्हाला मुलं लग्न करण्यास टाळाटाळ का करतात याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Relationship : सिंगल आहात, तर मग फायदेही घ्या जाणून

लूक्स-हाइट आणि आत्‍मविश्‍वासाची कमतरता असणे

अनेक मुलं लुक्स किंवा हाइट तसेच आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे सिंगल लाइफ जगण्यास तयार होतात. त्यांना लग्न करावसं वाटत नाही.

आयुष्याबाबत सीरीअस राहत नाही

अधिकतर पुरुष आयुष्यात मजामस्ती करण्यात इतके दंग असतात की ते स्वत:ची काहीही काळजी घेत नाही. जे त्यांच्या लाइफसाठी खुप निगेटिव अप्रोच असतं कारण महिलांना अशा पुरुषांसोबत राहायला आवडत नाही. महिलांना नेहमी आयुष्याबाबत सीरीअस असणारे पुरुष आवडतात.

हेही वाचा: Relation Tips: जोडीदाराच्या या सवयी मुलींना अजिबात आवडत नाहीत

स्वत:वर विश्वास नसणे

अनेक पुरुषांना स्वत:वर विश्वास नसतो. आपल्या आवडी निवडीवर ते ठाम नसतात. ते सतत कन्फूज असतात. त्यामुळे लग्नासारख्या मोठ्या निर्णयावर ते लगेच होकार देत नाही आणि टाळाटाळ करतात.

लाजाळू असणे

अनेक पुरुष लाजाळू असल्यानेही लग्नासारख्या मोठ्या गोष्टीवर बोलण्यास टाळतात. हे सहसा कुणासोबतही फार बोलत नाही. त्यांचे फार जास्त मित्र नसतात त्यामुळे ते नेहमी एकटे पडतात. अशात ते कधीही रिलेशनशीपमध्ये येण्याचा विचार करत नाही आणि ते अविवाहीत राहतात आणि लग्न करण्यास टाळाटाळ करतात.

हेही वाचा: Relation Breakup होण्याच्या मार्गावर आहे? गर्लफ्रेंडला मनवण्याचे 6 मार्ग

खुप चूजी असणे

काही पुरुष खुप चूजी असतात. मला असंच हवं, मला तसंच हवं; असा त्यांचा नेहमी अट्टहास असतो. पण हे चुकीचं आहे. यामुळे लग्न करताना त्यांच्या चूजी स्वभावामुळे त्या बऱ्याच मुलींना रिजेक्ट करतात आणि मनासारखा जीवनसाथी मिळत नसल्याने लग्न करण्यास टाळाटाळ करतात.

एक्स रिलेशनशिपचा वाईट अनुभव

अनेक पुरुष रिलेशनशिपमध्ये राहल्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ करतात. एक्स रिलेशनशिपचा आलेला वाईट अनुभव पाहून ते लग्न करण्यास मागेपुढे पाहतात.