Eating Habits  : कुछ मीठा हो जाये; गोड जेवणाआधी खावं की नंतर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eating Habits

Eating Habits  : कुछ मीठा हो जाये; गोड जेवणाआधी खावं की नंतर?

काही लोकांना जेवताना किंवा जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांना जेवल्याचे फिलिंगच येत नसावे. काहीतरी तिखट लागल्यावर लोक पटकन गोड खातात. पण, सतत गोड खाणे आरोग्यासाठी चांगले नसते.

या खाण्याच्या सवयीबद्दलची जास्त माहिती नसल्याने लोक गोड खाण्याला गांभिर्याने घेत नाही. अनेकांना अन्न खाल्ल्यानंतर गोड खाण्याची हौस असते. पण, नंतर त्यांना त्याचे दुष्परीणाम भोगावे लागतात. त्यामूळेच आज जेवताआधी गोड खावे की नंतर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

हेही वाचा: Genelia D'Souza : चिकन शिवाय कसा बनवायचा चिकन पुलाव? गोड मराठीत जेनलियाने दिली आयडीयाची कल्पना!

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर गोड खाण्याच्या चुकीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवणानंतर मिठाई खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते, असा विचार करून लोक गोड पदार्थाचे सेवन अधिक करतात.

हेही वाचा: Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

तज्ञांच्या मते, असे काहीही होत नाही. आयुर्वेदातही या सवयीला चुकीची मानली गेली आहे. कारण, आयुर्वेदानूसार, गोड पदार्थ जेवल्यानंतर नाही तर जेवणाआधी खाणे उपयुक्त ठरते. आरोग्य तज्ज्ञांनी यामागे अनेक कारणे दिली आहेत. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

हेही वाचा: Pav Bhaji : नाश्त्यात पाव भाजी खाणे चांगले का वाईट?

- तज्ज्ञांच्या मते, जेवण करण्यापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने जेवण पचायला सोपे जाते.

- जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्यास टेस्ट बड्स सक्रिय होतात. त्यामुळे जेवणाची चव आणखी छान लागते.

हेही वाचा: Diet Tips : खाण्याच्या या सवयी तुम्हाला देतील सुदृढ शरीर

- जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने पचन मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची भीती राहते.

- जेवणानंतर गोड खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. पण, मिठाईऐवजी गूळ किंवा खजूर खाणे हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो.

- जेवणानंतर लगेच गोड खाण्याने आम्लपित्त, फुगणे, फुगणे असे त्रास होऊ शकतात.

हेही वाचा: Diet Tips : खाण्याच्या या सवयी तुम्हाला देतील सुदृढ शरीर