EV Charging Tips: सोलर पॅनलचा वापर करून इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करू शकतो का? वाचा सविस्तर

EV Charging Tips: इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी सोलर पॅनलचा वापर करणे किती योग्य आहे हे जाणून घेऊया.
EV Charging Tips:
EV Charging Tips: Sakal

आजकाल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. इलेक्ट्रिक कार घर, ऑफिस किंवा कोणत्याही पॉवर स्टेशनवर सहज चार्ज करता येतात. पण तुम्हाला माहितीय का सोलर पॅनलचा वापर करून देखील चार्ज करू शकता? तसेच याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

रुफटॉप सोलर

छतावर बसवलेल्या सोलर पॅनेलचा वापर घरातील लाइट,फॅन यासारख्या विजेवर चालणाऱ्या वस्तूंना वीज देण्यासाठी केला जातो. तसेच सोलर पॅनलचा वापर इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी देखील करू शकता. रुफटॉप सोलर सिस्टीम बॅटरी स्टोरेज सिस्टीमने जोडलेली असते. यामुळे जास्तीत जास्त वीज स्टोअर करता येते.

सोलरवर चालणारे सार्वजनिक चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक कारला ऑन-रोड चार्जिंगची आवश्यकता असू शकते. त्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन बनवले आहेत. या सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनवर सोलर पॅनल देखील स्थापित केले जाऊ शकतात. कारमध्ये बसवलेल्या नेव्हिगेशन सिस्टमच्या मदतीने किंवा कोणत्याही अॅप्लिकेशनचा वापर करून चार्जिंग स्टेशनचा शोध घेऊ शकता.

EV Charging Tips:
Car Care : कारमधील एसी फॅनचा वेग वाढवल्यास मायलेज होऊ शकते कमी? जाणून घ्या सविस्तर

सोलर पॅनलने इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचे फायदे कोणते?

जर तुम्ही घरामध्ये सोलर पॅनल लावले आणि त्यावर तुमची कार चार्ज केली, तर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी स्थानिक वीज कंपनीला पैसे द्यावे लागणार नाहीत. यामुळे तुम्ही दरवर्षी हजारो रुपयांची बचत करू शकता. सोलर पॅनल वापरणे ही एक वेळची गुंतवणूक आहे. त्यामुळे वीज बिलात कपात होऊ शकते. तसेच सोलर पॅनलचा वापर करणे पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com