
ऑफिसचा मेल करताना Emoji वापरता का? Research काय सांगतो वाचा!
आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज पाठवताना आपण अनेक इमोजी वापरतो. किंबहुना आपल्या भावना अनेकजण इमोजी वापरून व्यक्त करायला लागले आहेत. पण इमोजी कुठे आणि कसे वापरावेत याचीही एक वेळ असते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी इमोजी वापरलेत तर तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांना ऑफिसचे मेल करतानाही इमोजी वापरण्याची सवय असते. तर काही लोकं ऑफिसमध्ये आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडू शकतात. ज्या लोकांना मेलवर इमोजी वापरण्याची सवय असते त्यांच्यात विचार मांडण्याची कुवत कमी असते, तसेच ते कमी कार्यक्षम असतात, असे एका नवीन अभ्यासात सांगितले आहे. तेल अवीव विद्यापीठाच्या कॉलर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. 'ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर अँड ह्युमन डिसीजन प्रोसेसेस' या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
हेही वाचा: घर आणि ऑफिसचं काम करताना तारांबळ उडते? असा राखा कामाचा समतोल
असा केला अभ्यास - जे कर्मचारी ईमेल, झूम प्रोफाइल किंवा टी-शर्टवर कंपनी लोगोमध्ये चित्रे - इमोजी वापरतात ते कमी कार्यक्षम असतात, असे संशोधकांचा निष्कर्ष सांगतो. यावेळी अमेरिकन लोकांवर जो अभ्यास घेण्यात आला त्यामध्ये या लोकांचे मौखिक संदेश तसेच चित्रांद्वारे मॅसेज पाठवणाऱ्या प्रतिसादाचे परीक्षण केले. सर्व प्रयोगांमध्ये, ज्या लोकांनी आपले म्हणणे थेट मांडले होते, त्यांना इमोजीद्वारे मत व्यक्त करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मते मिळाली.
हेही वाचा: Office Wear Ideas: ऑफिसमध्ये स्टाईलिश दिसायचंय! या टिप्स लक्षात ठेवा
संशोधकांच्या मते, आज आपण इमोजीच्या माध्यमातून अनेक प्रकारे संवाद साधतो. सोशल नेटवर्किंग साईटवर असे अनेक इमोजी आहेत. ते मजेदारही वाटतात. पण आमच्यान निष्कर्षांनुसार असे इमोजी कामाच्या ठिकाणी, व्यावसायिक वातावरणात वापरलेत तर त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कारण तुमच्यात पात्रता कमी आहे, विचार मांडण्याची क्षमता नाही असा संदेश त्यातून व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या संदर्भात मेल पाठवताना इमोजीचा वापर करूच नका. तुम्हाला सवय असेल तर ती तात्काळ बदला. पाठवण्याआधी दोनदा मेल बघा, विचार करा. कारण यामुळे तुमच्या सामर्थ्यावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा: Office मध्ये तासनतास एकाच जागी बसून काम करताय! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

emoji
अभ्यासात काय आढळले?- तेल अवीव विद्यापीठातील कॉलर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील डॉ एलिनॉर अमित आणि प्रो. शाई डॅनझिगर यांनी UCSD येथील रेडी स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील प्रा. पामेला के. स्मिथ यांच्या सहकार्याने हा अभ्यास केला. संशोधकांनी गृहितकांची चाचणी घेण्यासाठी प्रयोगांची सिरिज आयोजित केली होती. त्यात शेकडो अमेरिकेतील लोकांना दैनंदिन परिस्थिती दाखवली गेली. एका प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना किराणा दुकानात खरेदी करताय, अशी कल्पना करण्यास सांगितले. या लोकांना रेड सॉक्स टी शर्ट घातलेली व्यक्ती दाखवली. काही लोकांना RED SOX असलेला टी-शर्ट शाब्दिक पद्धतीने दाखवण्यात आला. तर काहींना चित्र, इमोजी रूपात तसा टीशर्ट दाखवला. ज्यांनी चित्र, लोगो असलेला टिशर्ट पाहीला त्यांना शाब्दिक लोगो पाहणाऱ्यांपेक्षा कमी सामर्थ्यवान म्हणून रेट केले गेले. इतर परिणामांच्या बाबतीत असेच दिसून आले.
हेही वाचा: ऑफिसचे E-Mails घरी आल्यावरही चेक करताय! होईल मानसिक त्रास
अभ्यासातील निष्कर्ष - शास्त्रज्ञ सांगतात की, इमोजी पाठवणे किंवा इमोजीचा सातत्याने वापर करणे हे जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बाधा आणू शकते. याचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. जवळच्या नातेसंबधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे इमोजी पाठवताना दोनदा विचार करा. त्याचा प्रभाव लक्षात घ्या, किंवा पाठवू नका. त्याऐवजी स्पष्ट मत मांडायला महत्व द्या. असे संशोधक सांगतात.
Web Title: Employees Who Use Emojis Pictures In Emails Are Perceived Less Powerful Study
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..