
Office मध्ये तासनतास एकाच जागी बसून काम करताय! या पाच गोष्टी लक्षात ठेवा
ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असतो. कर्मचाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकाच जागेवर बसून तासनतास काम करावे लागते. काम तर पूर्ण होते पण त्याचा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. महत्वाचे म्हणजे, तासनतास एकाच जागी स्थिर बसून काम केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे एका जागी बसताना लोकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. एका जागी बसून काम केल्याने पुढील समस्या निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा: ऑफिसमध्ये १० तास काम करताना पार दमताय! या प्रकारे व्हा रिफ्रेश
निर्माण होऊ शकतात या समस्या
1) हृदयाच्या समस्या- एका जागी तासनतास बसल्याने शरीर सक्रीय राहत नाही. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. तसेच हृदयरोगाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
२) मधुमेहाचा धोका- सतत एकाजागी बसल्याने रक्तातील गुल्कोज कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. जास्त वेळ एकाच जागी बसून ऑफिसचे काम केल्याने पाठ, कंबर दुखण्याच्या समस्या निर्माण होतात.
हेही वाचा: Morning Drinks : रिकाम्यापोटी जीरं, ओव्याचे पाणी प्यायल्याने होतील 'हे' फायदे

Weight gain
३) वजन वाढू शकते- दिवसभर एकाच जागी बसून काम केल्याने शरीरातली कॅलरीज बर्न होत नाही त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जास्त वेळ बसून राहिल्याने इन्सुलिन हार्मोन्स ग्लुकोज रक्ताबाहेर पेशींमध्ये हलवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ग्लुकोज रक्तातच राहून लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते.
४) कमकुवत हाडे- दिवसभर बसून राहिल्याने तसचे काहीही हालचाल न केल्याने त्याचा तुमच्या हाडे आणि सांध्यांवर वाईट परिणाम होतो. जास्त वेळ बसल्याने हाडांची घनता कमी होते, फ्रॅक्चरचा धोका वाढतो. तसेच हाडांची वाढ थांबल्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
५) कॅन्सर- जास्त वेळ बसण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. जर एखादी व्यक्ती जास्त वेळ बसते आहे. पण, दिवसभर व्यायाम, नृत्य, खेळ इत्यादी कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करत नसेल तर त्याला हृदयरोग, कर्करोग आणि इतर आजारा होण्याचा धोका जास्त असतो.
हेही वाचा: महिलांनो, वयानुसार आहारात करा 'असा' बदल, साठीनंतर राहाल फिट!
Web Title: Office Time Sitting For Long Time In One Position Effects On Body
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..