Driving करताना ही कागदपत्रं कायम सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल १५ हजारांपर्यंत दंड आणि होऊ शकतो तुरुंगवास

ड्रायव्हिंग करत असताना लायसन्ससोबतच काही दस्तावेज सोबत असावेत. हे दस्तावेज कोणते याबद्दल जाणून घेऊयात
ड्रायव्हिंगसाठी आवश्यक कागदपत्रं
ड्रायव्हिंगसाठी आवश्यक कागदपत्रंEsakal

जर तुम्ही कार घेऊन घराबाहेर पडत असाल म्हणजेच कारने प्रवास Car Travel करत असाल तर तुमच्यासोबत काही कागदपत्र कायम बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कितीही घाई गडबड असली तरी कागदपत्र सोबत असणं आवश्यक आहे. Essential Papers required for driving the car to avoid fine

कारची किंवा ड्रायव्हिंसाठी Driving लागणारी काही महत्वपूर्ण कागदपत्र जर तुमच्याकडे नसली आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी Traffic Police रोखलं तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. एकाद्या नाकाबंदीवेळी किंवा दुर्घटनेच्यावेळी पोलिसांनी तुमची गाडी थांबवून कागदपत्रांची Documents तपासणी केली असता तुमच्याकडे सर्व कागदपत्र असणं गरजेचं आहे.

अन्यथा तुम्हाला मोठा भुर्डंद भरावा लागू शकतो. एवढचं नव्हे तर तुम्हाला जेल देखील होवू शकते. ड्रायव्हिंग करत असताना लायसन्ससोबतच काही दस्तावेज सोबत असावेत. हे दस्तावेज कोणते याबद्दल जाणून घेऊयात.

परवाना Driving Licence- कार चालवत असताना तुमच्याकडे कायम ड्रायव्हिंग लायसन्स परवाना असणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायन्समुळे तुम्ही कायदेशीररित्या वाहन चालवण्यास सक्षम आणि पात्र आहात, हे सिद्ध होतं.

कोणत्याही प्रसंगात पोलिसांनी वाहन रोखल्यास तुमच्याकडील सर्वप्रथम परवाना तपासला जातो. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला ५ हजार रुपये दंड भरावा लागेल.

तुम्हाला माहिती नसेल तर काही देशांमध्ये तुमचं भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स कार चालण्यासाठी ग्राह्य धरलं जातं. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भूतान, मलेशिय़ा, दक्षिण अफ्रिका, फ्रान्स अशा काही देशांचा समावेश आहे.

हे देखिल वाचा-

ड्रायव्हिंगसाठी आवश्यक कागदपत्रं
Light Foot Driving नेमकं आहे तरी काय? यामुळे कार देईल जबरदस्त मायलेज

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)- अनेकदा पोलिस चालकाकडून लायसन्ससोबतच गाडीचं आरसी बुक देखील तपासण्यासाठी मागतात. यामध्ये गाडीच्या मालकाचं नाव, इंजन डिटेल्स, रजिस्ट्रेशन नंबर, तारीख, गाडीचं नाव, मॉडेल अशी सर्व माहिती उपलब्ध असते.

जर तुमच्याकडे RC Book नसेस तर तुम्हाला तब्बल १०,००० रुपये दंड भरावा लागू शकतो. तसंच तुम्हाला ६ महिन्यांपर्यंत जेलदेखील होवू शकते. तसंच हा नियम तुम्ही दुसऱ्यांना मोडल्यास तुम्हाला १५ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

इन्श्युरन्स- अनेकजण वाहन चालवताना गाडीचे इन्श्युरन्स पेपर सोबत बाळगणं गरजेचं समज नाहीत. मात्र एखाद्यावेळी तुम्हाला पोलिसांनी रोखल्यास तुमच्याकडून कोणत्याही कागदपत्रांची विचारणा होवू शकते. अशावेळी गाजीच्या विम्याचे कागदही सोबत असणं गरजेचं आहे.

जर तुमच्याकडे इन्श्युरन्स सर्टिफिकेट नसेल तर तुमचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो. तसंच तुम्हाला २ हजार रुपये दंड भरावा लागेल.

PUC सर्टिफिकेट- प्रत्येक वाहनधारकाकडे PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. एवढचं नव्हे तर हे सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं नसावं. यासाठी तुमचं PUC सर्टिफिकेट योग्यवेळी रिन्यू करणं गरजेचं आहे.

जर तुमच्याकडे बीएस ३ वाहन असेल तर दर ३ महिन्यांनी PUC सर्टिफिकेट रिन्यू करावं लागेल. तसंच जर तुमच्याकडे BS IV वाहन असेल तर तुम्हाला ते दरवर्षी रिन्यू करावं लागेल.

जर तुमच्याकडे PUC सर्टिफिकेट नसेल किंवा ते एक्सपायर झालेलं पोलिसांना आढळलं तर तुम्हाल १० हजार रुपये दंड होवू शकतो. तसंच ६ महिने जेल देखील होवू शकते.

ओळखपत्र- ओळखपत्र तुमच्यासोबत कायम असणं गरजेचं आहे. केवळ ड्रायव्हिंग करतेवेळीच नव्हे तर घराबाहेर पडताना कायम सोबत ओळखपत्र बाळगावं. ओळखपत्राच्या मदतीने पोलिस तुमची इतर कागदपत्र पडताळू पाहतात. यासाठी ड्रायव्हिंग करताना ओळखपत्र सोबत असावं

अशा प्रकारे कोणतही चलान लागण्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर ही सर्व कागदपत्र कायम सोबत ठेवा.

हे देखिल वाचा-

ड्रायव्हिंगसाठी आवश्यक कागदपत्रं
Car Driving करत असताना मुसळधार पाऊस सुरू झाल्यास या गोष्टींची घ्या काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com