Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये

तब्बल साडे चार लाख प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडून भारतीय मुलीने झोपण्याची स्पर्धा जिंकली.
Sleeping Record
Sleeping Recordesakal

हायलाइट्स :

  • सलग १०० दिवस ९ तास झोपली

  • उठताच हातात लाखोंचं बक्षीस

  • पाहा कोण आहे त्रिपर्णा चक्रवर्ती

Sleeping Record : एकीकडे मुख्यमंत्री किती कमीवेळ झोपूनही किती एनर्जिएटिक राहतात याची चर्चा रंगत आहे. तर, एका भारतीय मुलीने चक्क १०० तास झोपण्याचा विक्रम केला आहे.

Sleeping Record
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री लवकर झोप येत नाही? ट्राय करा ‘या’ टिप्स

पश्चिम बंगालच्या त्रिपर्णा चक्रवर्ती तरुणीने सलग १०० दिवस झोप काढून देशातील पहिली स्लीपिंग चॅम्पियन म्हणून विक्रम केला आहे. या तरुणीने तब्बल १०० दिवस झोपून हा विक्रम केला आहे. तिने तब्बल साडे चार लाख प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडून तिने ही स्पर्धा जिंकली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी तिला लाखोंचं बक्षीसही मिळालं आहे.

Sleeping Record
Health Tips: झोप पूर्ण होऊन पण येतो आळस? हे उपाय करा

पश्चिम बंगालच्या हुगळी येथे राहणाऱ्या या तरुणीने सर्वोत्कृष्ट झोपेचा किताब पटकावला आहे. त्यासाठी तिला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तब्बल साडे चार लाख स्पर्धकांना मागे टाकत, श्रीरामपूर, हुगळीच्या त्रिपर्णा चक्रवर्तीने सर्वोत्कृष्ट झोप घेणाऱ्या व्यक्तीचा किताब पटकावला आहे.

Sleeping Record
चांगली झोप घेण्यासाठी झोपण्यापूर्वी हे खा

याबद्दल त्रिपर्णा म्हणाली की, अखिल भारतीय स्तरावर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे ऑनलाइन वेबसाइटद्वारे कळल्यावर तिने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला. या स्पर्धेत एकूण साडे चार लाख अर्ज आले होते. ज्यामध्ये १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यातून अंतिम स्तरावर स्पर्धेचे विजेते होण्यासाठी ४ जणांची निवड करण्यात आली.

Sleeping Record
चांगली झोप येण्यासाठी 'ही' फळे खाणे आवश्यक, पाहा कोणती?

अंतिम सामन्यात तिने चौघांवर मात करत सर्वोत्कृष्ट स्लीपिंग पर्सनचा किताब पटकावला. त्यानुसार या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला एक मॅट्रेस आणि स्लीप ट्रॅकर देण्यात आलं होतं. या सर्वांना सर्वाधिक झोपण्याची क्षमता दाखवण्यास सांगण्यात आले.

Sleeping Record
शांत झोप लागत नाही? मग रोज करा ही 5 योगासने

त्रिपर्णाने सलग १०० दिवस ९ तास झोपून हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यानंतर तिने ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकल्याबद्दल तिला ६ लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. तिला प्रत्येकी एक लाख रुपयांचे सहा धनादेश देण्यात आले आहेत.

Sleeping Record
पश्चिम बंगाल : इंडियन ऑइल कॅम्पसच्या आगीत तिघांचा मृत्यू, 50 जखमी

त्रिपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, लहानपणापासूनच तिला झोपण्याची खूप आवड आहे आणि तिला जेव्हाही झोप येते तेव्हा ती बिनदिक्कत झोपते. बोर्डाच्या परीक्षेपासून ते मुलाखतीच्या परीक्षेपर्यंत अनेकवेळा तिला परीक्षेच्या वेळीही अनेकदी ती झोपली आहे.

सध्या त्रिपर्णा अमेरिकेत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते आणि सध्या तिचं वर्क फ्रॉम होम सुरुये. यासाठी तिला रात्री काम करावं लागते. ज्याची भरपाई ती दिवसभर झोपून करते. तिच्या आवडीनुसार या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याने तिला खूप आनंद झाला आणि तिला स्वतःचा अभिमान वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com