Face Care : चेहऱ्याला महागड्या क्रिम्सपेक्षा घरगुती तूप लावणे कधीही चांगलेच, इतके आहेत फायदे

तूप लावण्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत
Face beauty tips
Face beauty tipsesakal

Face Care :

चेहऱ्याला मुलायम बनवण्यासाठी आपण अनेकवेळा महागड्या क्रिम वापरतो. काही तरूणी तर चेहरा डागांपासून मुक्त व्हावा म्हणून त्रासदायक ट्रिटमेंट करून घेतात. या प्रक्रियेमुळे चेहरा तात्पुरता गोरा, मऊ, मुलायम दिसायला लागतो. पण थोडावेळानंतर होता त्याहुन अधिक रूक्ष चेहरा दिसायला लागतो.

टिव्हीवर दिसणाऱ्या जाहीरातींतील क्रिम्सपेक्षा गुणकारी असलेले तूप लावूनही चेहरा मऊ बनवता येतो. आणि महत्त्वाचे म्हणजे, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. पण चेहऱ्याला तूप लावायचे कसे, त्याचे फायदे काय आहेत हे पाहुयात. (Ghee on face)

Face beauty tips
Pineapple Face Packs : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अननसाची घ्या मदत, बनवा ‘हे’ फेसपॅक्स

तूपामध्ये असलेले गुणधर्म कोणते

तूपामध्ये ए, डी, ई आणि के जीवनसत्त्वे आहेत. त्यात ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात. याव्यतिरिक्त, तुपात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला नुकसान करणारे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात. (Ghee Benefits)

Face beauty tips
Winter Face Care : हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर काय लावावे?

पहिली पद्धत

चेहऱ्यावर तूप लावण्यासाठी तळहातावर तुपाचे २ थेंब टाकून चेहऱ्याला चोळा. बोटांनी डोळ्याखाली तूप लावा म्हणजे काळी वर्तुळे कमी होऊ लागतात. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रात्रभर तूप लावून ठेवू शकता आणि जर तुमची त्वचा सामान्य किंवा तेलकट असेल तर 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. (Ghee beauty tips)

Face beauty tips
Corn Flour Face Packs : आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे मक्याचे पीठ, ‘या’ पद्धतीने करा चेहऱ्यावर वापर

दुसरी पद्धत

त्वचेवर फक्त तूप लावण्यासोबतच याचा वापर फेस पॅक बनवण्यासाठीही करता येतो. 2 चमचे बेसनात एक चमचा तूप घालून त्यात काही थेंब दुधाचे टाका. चांगले मिसळा आणि हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. त्वचेवर दिसणारे काळे डाग कमी होतील आणि त्वचा चमकदार दिसेल.

Face beauty tips
Face Roller Benefits : चेहऱ्यासाठी लाभदायी असणारे 'फेस रोलर' काय आहे? जाणून घ्या 'हे' फायदे

तिसरी पद्धत

एका प्लेटमध्ये देशी तूप टाका आणि त्यात थोडेसे पाणी घाला आणि बोटांनी गोलाकार हालचाली करा. ताटात तूप काही वेळ फिरवल्याने तूप घट्ट होईल आणि फुगलेली पेस्ट दिसेल. ही पेस्ट चेहऱ्यावर क्रीमप्रमाणे लावता येते.

यामुळे त्वचा मुलायम होते आणि सुंदर दिसते. चेहऱ्याशिवाय ओठांवरही तूप लावता येते. यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com