उन्हाळ्यात चेहरा टॅन होतोय? कैरीचं घरगुती फेसपॅक वापरा|Skin Care | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raw mango

उन्हाळ्यात चेहरा टॅन होतोय? कैरीचं घरगुती फेसपॅक वापरा

उन्हाळ्यात चेहरा फ्रेश आणि ग्लोइंग ठेवणे, हे खूप मोठे आव्हान असते. स्किन केअर करण्यासाठी आपण अनेक रुटीन फॉलो करत असतो पण अनेकदा याचा काहीही फायदा होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? सध्या उन्हाळ्यात उपलब्ध असलेली कैरी सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

सहसा जेवणात लोक कैरीचा भरपूर वापर करतात. त्याचबरोबर कैरीचे पन्हे, कैरीपासून बनवलेली कैरीची चटणी अशा अनेक गोष्टी उन्हाळ्यात खाल्ल्या जातात पण त्याचसोबत त्वचेची निगा राखण्यासाठी सुद्धा कैरीचा वापर करणे अतिशय फायदेशीर ठरते. कच्चा आंबा व्हिटॅमिन ए,(A) व्हिटॅमिन सी (C) तसेच अँटी-ऑक्सिडेंटचा चांगला स्रोत मानला जातो. अशा परिस्थितीत कैरीचा त्वचेवर वापर केल्याने उष्णतेपासून आराम तर मिळतोच, पण त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासूनही लगेच सुटका मिळते.

हेही वाचा: धूम्रपान सोडलं नाहीत तर अशी होईल डोळ्यांची अवस्था

त्वचेची निगा राखण्यासाठी कैरीपासून किती आश्चर्यकारक फायदे आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत.

त्वचेच्या काळजीसाठी कैरीचे फायदे

उन्हाळ्यात ऊन,धूळ आणि घामामुळे त्वचेवर मुरुम, टॅनिंग, सनबर्न, सुरकुत्या, आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा यांसारख्या समस्या दिसू लागतात. अशात कैरीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्याच वेळी, आंब्यामधील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी खराब त्वचेच्या पेशी काढून टाकून त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.

हेही वाचा: तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता का? हार्ट रेट कमी होऊ शकतो

कैरी त्वचेवर कसा वापरायची ते जाणून घेऊया.

कैरी आणि ओट्सचा फेस पॅक लावा

कच्चा कैरी आणि ओट्सचा फेस पॅक त्वचेच्या मृत पेशी (dead cells) काढून त्वचेचा टोन सुधारण्यासाठी मदत करतात. यासाठी १ कैरी कापून बारीक करून घ्या. त्यात 3 चमचे दलिया आणि 7-8 बदाम बारीक करून मिक्स करा. नंतर त्यात २ चमचे कच्चे दूध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, त्यानंतर १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा मुलायम आणि ताजी राहते.

हेही वाचा: आयुर्वेद म्हणतं, उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करा, थकवा होणार गायब

कैरी आणि बेसन फेसपॅक वापरा

उन्हाळ्यात टॅनिंग, सनबर्न, मुरुम हे खूप प्रभावी असतं आणि मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी ही एक अतिशय उत्तम असते. यासाठी ४ कैरी कापून बारीक करा. आता त्यात 2 चमचे बेसन, 1 चमचे मध, 1 चमचे दही आणि आणि हलकीशी हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा हायड्रेट होईल आणि चेहऱ्याची चमकही कायम राहील.

Web Title: Facepack From Raw Mango Is Beneficial For Skin Care Follow Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top