
आयुर्वेद म्हणतं, उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करा, थकवा होणार गायब
देशासह महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजलाय. विशेषत: तापमान गगनाला भिडले असून लोक घराच्या बाहेर जायला घाबरतात.अशा उष्ण तापमानात तुमच्या शरीर सिस्टमला फायदेशीर असलेले अन्न खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. चुकीचे अन्नाचे सेवन शरीराला धोकादायक असू शकते.त्यामुळे नैसर्गिकरित्या हायड्रेटिंग पेये आणि सोयीस्कर अन्न आपण सेवन केले पाहिजे. उन्हाळ्यातील सात खाद्यपदार्थ आणि पेयांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. (food items and beverages that you can have to tackle this summer heatwave.)
उन्हाळ्यात फ्रिजच्या बाहेर जास्त वेळ अन्न ठेवल्यास ते शिळे होते. कारण अति उष्णतेमुळे ते खराब होतात, विशेषत: तेलकट, आंबट आणि गरम पदार्थ शरिराला घातक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आपण असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. शरीराला नैसर्गिकरीत्या थंड करणारे पदार्थ जसे की नारळपाणी, ताक, टरबूज इ. उष्णतेवर मात करण्यासाठी काही उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा: cholesterol कमी करायचा? उपाशी पोटी घ्या एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस
आयुर्वेदानुसार उष्णतेवर मात करण्यासाठी खालील खाद्यपदार्थांचे सेवन करणे, आरोग्यासाठी उत्तम असते.
1. नारळ पाणी
नारळ हे शरिरासाठी सर्वोत्तम आहे.आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नारळ पाणीची पचनपूर्व आणि नंतरची चव फायदेशीर आणि चवीला गोड असते. नारळाच्या पाण्याचा शरीरावर थंड प्रभाव पडतो आणि या भयंकर उन्हाळ्यात लोकांनी दररोज किमान एक नारळ खावे. ज्यांची पचनशक्ती खराब आहे त्यांनीही कमी प्रमाणात नारळाचे सेवन करावे.
2. टरबूज
टरबूजमध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते ज्यामुळे एक अतिशय हायड्रेटिंग पदार्थ आहे. उन्हाळ्यातील एक लोकप्रिय फळ म्हणून टरबूजची ख्याती आहे. तुम्ही दिवसातून दोनदा त्याचा आनंद घेऊ शकता. टरबूज थंड असल्याने त्याचा शरिरावर उत्तम प्रभाव असतो. तुम्ही टरबूजला रसाच्या रूपात देखील घेऊ शकता. टरबूज यकृत आणि किडनीचे कार्य देखील व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
3. काकडी
आयुर्वेदात तिला 'सुशीतला' म्हणतात, याचा अर्थ नैसर्गिकरित्या थंड असणे. लघवी किंवा जास्त तहान लागण्याशी संबंधित समस्या असलेल्या रुग्णांना काकडी अनेकदा उपयोगी पडते. काकडीत पाण्याचे प्रमाणही भरपूर असते जे उष्णतेवर मात करू शकते आणि तुमचे शरीर थंड ठेवते.
हेही वाचा: तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता का? हार्ट रेट कमी होऊ शकतो
4. अंकुरलेली मूग डाळ
मूग डाळ देखील अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक मानली जाते, विशेषतः उन्हाळ्यात मूग डाळ ही शरिरासाठी अधिक पोषक आहे. मूग डाळ शरीरातील पित्त दोष संतुलित करण्यास मदत करते. मूग डाळ ही अगदी सहज पचण्याजोगी आहे आणि जवळजवळ दररोज सेवन केली जाऊ शकते.
5. ताक
भारतात शेकडो वर्षांपासून ताक कूलिंग रिफ्रेशमेंट म्हणून खाल्ले जाते. ताकात आपली पचन सुधारण्याची क्षमता असून ते आपल्या पित्त दोषाला देखील मदत करू शकते. ताक हे दिवसातून अनेकदा प्या. ते शरिराला पोषक असतं.
हेही वाचा: मासिक पाळीत पोट दुखतयं? हे पाच उपाय ट्राय करा
6. जवस
जवस हे नैसर्गिक स्नॅक्स आहेत जे दिवसाच्या केव्हापण सेवन केले जाऊ शकतात. जवसात केवळ थंड करण्याचे गुणधर्मच नाहीत तर त्यामुळे पचनक्रियेतही मदत होते. लठ्ठपणा, बद्धकोष्ठता किंवा उच्च रक्तदाब असल्यास जवसचे सेवन करावे.
7. पुदिना आणि कडुलिंबाची पाने
मळमळ, डोकेदुखी आणि पचन विकार यासारख्या समस्या बरे करण्यासाठी पुदीना बहुतेकदा आयुर्वेद सूत्र म्हणून वापरले जाते. उन्हाळ्यात या समस्या अनेकदा निर्माण होतात आणि म्हणून त्यात पुदिन्याची पाने असलेले पेय आपल्या शरीरासाठी खूप हायड्रेटिंग आणि फायदेशीर ठरू शकते.
दुसरीकडे कडुलिंबाची पाने वाढलेल्या पित्ताला संतुलित ठेवण्यासाठी उत्तम आहेत आणि कडुलिंब रक्त शुद्ध करण्यास मदत करतात.
Web Title: Check Food Items And Beverages That You Can Have To Tackle This Summer Heatwave
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..