esakal | मोहरीचं तेल आणि सैंधव मीठाने म्युकोरमायकोसिस बरा होतो?
sakal

बोलून बातमी शोधा

मोहरीचं तेल आणि सैंधव मीठाने म्युकोरमायकोसिस बरा होतो?

मोहरीचं तेल आणि सैंधव मीठाने म्युकोरमायकोसिस बरा होतो?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

FactCheck : देशात सध्या कोरोना (coronavirus) आणि म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या दोन आजारांनी थैमान घातलं आहे. आतापर्यंत अनेक जणांना या विषाणूमुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर असंख्य जण अद्यापही या विषाणूविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे सध्या उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीमध्ये आपण आपली व कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यातच सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय करण्याविषयीची माहिती व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेक जण या माहितीची सत्यता न पडताळता थेट उपायदेखील करु लागले आहेत. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून तुरटी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचं तेल यांच्या एकत्रित मिश्रणामुळे म्युकोरमायकोसिसचा (Mucormycosis ) प्रादुर्भाव कमी होतो अशी माहिती व्हायरल होत आहे. परंतु, ही माहिती खोटी (false message) असल्याचं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ( PIB) या संस्थेने स्पष्ट केलं आहे. (false false-message-to-treat-Mucormycosis-with-salt-and-Alum-turmeric-mustard-oil-is-viral)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुरटी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचं तेल एकत्रितपणे सेवन केल्यास म्युकोरमायकोसिस बरा होतो, असं सांगण्यात येत आहे. मात्र, ही माहिती अत्यंत चुकीची व खोटी असल्याचं पीआयबीने सांगितलं आहे.

हेही वाचा: कांदा आणि सैंधव मीठामुळे कोरोना होतो बरा?

हेही वाचा: Yellow Fungus: काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर आणखी एक आजार

"म्युकोरमायकोसिसवर तुरटी, हळद, सैंधव मीठ आणि मोहरीचं तेल गुणकारी ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा खोटा असून ही माहिती फेक आहे. या घरगुती उपायामुळे म्युकोरमायकोसिस (Mucormycosis ) बरा होतो असा दावा कोणत्याही वैज्ञानिकांनी केलेला नाही किंवा तसं वैद्यकीय प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका", असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर दररोज असंख्य घरगुती उपाय सांगणारे मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक जण मेसेजची सत्यता न पडताळता केवळ घरगुती उपाय म्हणून हे प्रयोग करत आहेत. मात्र, अशा फेक मेसेजवर विश्वास ठेऊ नका. हे उपाय शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचं वारंवार आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.