
आजच्या युगात प्रसिध्द होण्यासाठी कोणी काय करेल याचा काही नेम नाही...आपण सोशल मीडियावर फॅशनचे विचित्र ट्रेंड पाहत असतो. काही जण त्याला आवडीने दाद देतात. तर काही नावं ठेवतात. पण आता तुम्हीच पाहा ना काहीजण फॅशनच्या नावाखाली असे वेगवेगळे प्रयोग आणत आहेत. ज्यामुळे तुम्ही देखील थक्क व्हाल!
आजच्या युगात प्रसिध्द होण्यासाठी कोणी काय करेल याचा काही नेम नाही...आपण सोशल मीडियावर फॅशनचे विचित्र ट्रेंड पाहत असतो. काही जण त्याला आवडीने दाद देतात. तर काही नावं ठेवतात. पण आता तुम्हीच पाहा ना काहीजण फॅशनच्या नावाखाली असे वेगवेगळे प्रयोग आणत आहेत. ज्यामुळे तुम्ही देखील थक्क व्हाल!
फॅशनच्या नावाखाली काहीही?
फॅशनची कोणतीही अचूक व्याख्या नाही. उदाहरणार्थ, जर एखादा ड्रेस आपल्याला फॅशनेबल बनवू शकतो आणि तोच ड्रेस घातल्यानंतर काही जणांना विचित्रही वाटू शकतो. पण फॅशन जगतात विचित्र म्हणता येणार नाही. कारण त्याला प्रसिद्ध फॅशन ब्रँड्सचा टॅग असतो. सोशल मिडियावर सध्या काही लोक आगामी पिढीसाठी हा फॅशन ट्रेंड सांगत आहेत. पण हेच ट्रेंड काही लोकांना विचित्र वाटले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा
छिद्रेवाला स्वेटर 90 हजार रुपयांना
लक्झरी ब्रँड 'प्राडा' ने नुकताच इंस्टाग्रामवर एका स्वेटरचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने स्प्रिंग समर 2021 कलेक्शनसाठी हे स्वेटर बनवले आहे. त्यात बर्याच छिद्रे (होल्स) आहेत. कंपनीने त्याची किंमत 905 डॉलर्स ठेवली आहे, म्हणजेच भारतीय चलनात त्याचे मूल्य सुमारे 90 हजार रुपये आहे.
हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
Prada charging £905 to look like a bit of Swiss cheese pic.twitter.com/8vFbfaHr05
— Hephzi Ferris (@H3phz1_m4yy) January 26, 2021
नेटकरी शेअर करताएत अनुभव
सोशल मीडियावरील नेटकरी या छिद्रेवाल्या स्वेटरच्या फॅशनमुळे याची खिल्ली उडवत आहेत. तर जेव्हा लोकांना या स्वेटरची किंमत कळली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटू लागले की, 'सर्व काही खरचं आहे का?' हे स्वेटर पाहून युजर्स बरेच मिम्स आणि त्यांचे स्वतःचे मजेदार अनुभव शेअर करत आहेत.