Fashion Tips : तुम्हीही दुकानदाराच्या बोलण्यात अडकून नकली बनारसी साडी घेतली नाही ना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

banarsi saree fashion tips

Fashion Tips : तुम्हीही दुकानदाराच्या बोलण्यात अडकून नकली बनारसी साडी घेतली नाही ना?

Fashion Tips : दुकानदाराला आपला माल खपवायचा असतो, तो समोरचा माणूस कसा आहे यानुसार तुम्हाला गंडवूही शकतो. अर्थात काही याला अपवाद असतात पण तरीही आपणच सावधानी बाळगण जास्त सोईच असतं.

हेही वाचा: Fashion Tips : दिवाळीला काय घालायचं? कृति सेननचा लुक करा रिक्रीएट!

बनारसी साडी कशी ओळखावी

प्रत्येकजण पारंपरिक लुक पसंत करतो मग ते लग्न असो किंवा जवळच्या व्यक्तीचे फंक्शन. पारंपारिक लूक परफेक्ट दिसण्यासाठी बायका किंवा मुली बनारसी साडी नेसणे पसंत करतात.आता प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही घातलेली बनारसी साडी खरी आहे हे की नाही हे कसं ओळखावं? कारण जेव्हा तुम्ही साडी खरेदी केली असेल तेव्हा दुकानदाराने अनेक प्रकारच्या हमी दिल्या असतील की,"मॅडम ही साडी बनारसी आहे, या साडीवर नक्षी केले आहे. एवढी स्वस्त तुम्हाला पुअर बनारसी साडी मिळणारच नाही." अशा सर्व गोष्टी ऐकून कोणीही प्रभावित होऊन साडी खरेदी करेल.

हेही वाचा: Fashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का?

या साडीला बनारसी साडीच का म्हणतात?

बनारसी साडीला हे नाव पडले कारण ही साडी उत्तर प्रदेशातील बनारसच्या विणकरांनी बनवली आहे. बनारसी साडी बनवण्यासाठी पातळ रेशमी धागा वापरला जातो. बनारसी साडीला स्वतःचा इतिहास आहे. राज घराण्यांसाठी बनारसी साड्या अस्सल सोन्या-चांदीच्या धाग्यांपासून बनवल्या जात असे.

हेही वाचा: Fashion Tips : तरूणींना इंप्रेस करायचंय, मग आजच फॉलो करा या टीप्स

बनारसी साडीवर बनवलेल्या डिझाईनवरून खऱ्या आणि नकलीमधला फरक ओळखा

बनारसी साड्यांच्या डिझाईन्स लहान, सुंदर आणि नाजूक असतात. अस्सल बनारसी साडीची किंमत डिझाईन आणि तिच्या कामावर अवलंबून असते. बनारसी साडीची किंमत 3,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, चांगल्या बनारसी साडीची किंमत 8,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असते.

हेही वाचा: Fashion Tips : लॉन्ग लास्टिंग मेकअपसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

बनारसी साडीवर बनवलेल्या डिझाईन्स अतिशय पातळ धाग्यांनी केल्या जातात. त्‍यामुळे तुम्‍हाला तिचे विणकाम पाहूनच कळेल की ती खरी बनारसी साडी आहे. बनारसी साड्या उत्तर प्रदेशातील चंदौली, बनारस, जौनपूर, आझमगड, मिर्झापूर आणि संत रविदासनगर जिल्ह्यात बनवल्या जातात. त्याचा कच्चा माल बनारसमधून येतो.