Bipasha Basu:'अगं तुला काही अक्कल!' प्रेग्नंसीमध्ये कुणी 'हाय हिल्स' घालतं का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu high heels

Bipasha Basu:'अगं तुला काही अक्कल!' प्रेग्नंसीमध्ये कुणी 'हाय हिल्स' घालतं का?

Bipasha Basu Trolled: बॉलीवूडचे सेलिब्रेटी दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आपल्या आवडत्या कलाकारांनी जराशी चूक केली की त्यावर चाहते बोलण्यास तयार असतात. मग तो कोणताही अभिनेता असो वा अभिनेत्री त्यानं केलेल्या चुकीला सहजासहजी माफी नसते. प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा ही सध्या प्रेग्नंट आहे. लवकरच ती गोड बातमी देईल. अशावेळी अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे बिपाशाला ट्रोल व्हावे लागले आहे.

बिपाशाला नेटकऱ्यांनी चांगलचं सुनावले आहे. त्याचं झालं असं की, ती हाय हिल्स (उंच टाचेच्या चपला) घालून घराबाहेर पडली होती. त्या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी बिपाशानं असं करताच तिला धारेवर धरले आहे. तू तर इतरांना अक्कल शिकवणारी, फिटनेस फ्रिकचे धडे देणारी आणि स्वताच अशाप्रकारे हाय हिल्स परिधान करुन बाहेर पडते. याला काय म्हणावं? दुसऱ्या नेटकऱ्यानं बिपाशावर राग व्यक्त केला आहे. तो म्हणतो, बिपाशा प्रेग्नंसीमध्ये कुणी हाय हिल्स घालतं का? काहींनी तिच्या पेहरावाचे कौतूक केले आहे. पण उंच टाचेच्या चपला यामुळे मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये बिपाशानं ऑरेंज कलरचा एक ड्रेस परिधान केला आहे. दुसरीकडे हाय हिल्समध्ये फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणामुळे बिपाशा ही वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आली होती. सहा वर्षानंतर बिपाशा आई होणार आहे. तिनं 2016 मध्ये अभिनेता करण ग्रोव्हरसोबत लग्न केले होते. काही दिवसांपूर्वी बिपाशाचा बेबी शॉवर इव्हेंट मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा: Katrina-Ranbir: रणबीर कतरिनाकडे पाहतच राहिला, 'नजर झुकीच नही!'

बिपाशाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचे झाल्यास तिनं 2001 मध्ये तिनं अजनबी पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं राज, गुनाह, जिस्म, जमीन, ऐतबार, मदहोशी, अपहरण आणि फिर हेराफेरी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याशिवाय ती काही वेब सीरिजमध्ये देखील दिसली आहे.

हेही वाचा: PS 1 Row: 'त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता'! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल!