रेखाचा तो खंग्री लूक पाहून अँग्री बच्चनही म्हणतील, 'चूकच झाली!' | Rekha Virtual Fashion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rekha Virtual Fashion

Rekha Virtual Fashion : रेखाचा तो खंग्री लूक पाहून अँग्री बच्चनही म्हणतील, 'चूकच झाली!'

Rekha Virtual Fashion: बॉलीवूडमध्ये चार दशकांहून अधिक काळ ज्या अभिनेत्रीनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं चाहत्यांना घायाळ केलं त्या रेखाजींचा आता सोशल मीडियावर एक भन्नाट फोटो व्हायरल झाला आहे. तो पाहून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच गंमतीशीर असल्याचे दिसून आले आहे.

रेखाजींची गोष्ट जेव्हा होते तेव्हा हमखास बिग बी महानायक अमिताभ यांच्या नावाचही चर्चा होताना दिसते. त्याला कारणही आहे. बॉलीवूडमधील सर्वात गाजलेली लवस्टोरी म्हणून रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिले जाते. हे दोन्ही सेलिब्रेटी कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकमेंकासमोर येतात तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे असते. त्यांच्यात बोलणं होत नसलं तरी त्यांचे व्हायरल होणारे फोटो खूप काही सांगून जातात.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

सध्या सोशल मीडियावर रेखाजींचा एक आगळा वेगळा लूक व्हायरल झाला आहे. त्यामधील त्यांचा लूक यापूर्वी त्यांच्या चाहत्यांनी देखील कधीच पाहिला नसेल. अशा स्वरुपाचा आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो जर बिग बी अमिताभ बच्चन यांनी पाहिला तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल अशी पैंजही काही नेटकऱ्यांची लागलेली दिसते आहे. एकानं तर अमिताभ आपली चूक झाली असे म्हटल्याशिवाय राहणार नाही. असे म्हटले आहे.

हेही वाचा: Chitra Wagh Trolled : 'वाघ ताई आपला बाण..' उर्फीवरुन नेटकऱ्यांनी घेतली चित्रा वाघ यांची शाळा

डिजिटल आर्टिस्ट आकांक्षा जैन यांनी रेखा व्हर्च्युअल फॅशन म्हणून रेखा यांचे काही फोटो वेगळ्या रुपात व्हायरल केले आङेत. त्यामध्ये रेखा यांचा तो साय फाय अवतार नेटकऱ्यांना भलताच भावला आहे. लिपस्टिक, कपाळावर ठसठशीत कुंकू या साऱ्याला साय फाय अवताराची जोड देण्यात आली आहे. ती चाहत्यांना कमालीची आवडली आहे.