पारदर्शकता असलेले निर्मळ नाते!

विजया बाबर आणि आनंद प्रभू यांची मालिका सुरू झाली तेव्हाची मैत्री आजही तितकीच घट्ट असून ती खऱ्या अर्थाने वेळेच्या कसोटीवर उतरलेली आहे.
True Friendship
True Friendship Sakal
Updated on

विजया बाबर आणि आनंद प्रभू

कलाक्षेत्रात लोक एकत्र काम करतात, पण त्या माध्यमातून निर्माण होणारी मैत्री काळाच्या ओघात विस्मरणात जाते. मात्र काही वेळा मैत्री अशी असते, की ती काळासोबत अधिक घट्ट होत जाते. अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता आनंद प्रभू यांची मैत्री हे त्याचे सुंदर उदाहरण आहे. एका मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारताना त्यांची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचा प्रवास आजही छान सुरू आहे. हे दोघे सध्या ‘झी मराठी’वरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकत आहेत. विजया ‘कमळी’ या मालिकेतून लवकरच पुन्हा दिसणार आहे. व्यावसायिक आयुष्यात व्यग्र असताना त्यांनी मैत्री प्रामाणिकपणे जपली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com