Ganesh Chaturthi 2023: गणेश पुराण नक्की काय आहे? कथा की जीवनसार? जाणून घ्या

गणेश पुराणातील तिसरा खंड महत्त्वाचा मानला जातो
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023esakal

Ganesh Chaturthi 2023: ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात आज वाजत गाजत सगळ्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांच्या आगमनासाठी तरूण मंडळेही सज्ज झाली आहेत. घरोघरी बाप्पाचे पूजन आरती करून बाप्पाला खास असा मोदकाचा नैवेद्य दाखवला जात आहे.

घरात एखादा बालमित्र आल्यामुळे बालचमूही खूश आहेत. घरात बाप्पा आल्यानंतर केलेली आरासही आत उठून दिसत असेल. एकूणच बाप्पांच्या आगमनामुळे चैतन्याचे वातावरण आहे.

हिंदूधर्मात १८ पुराणांबद्दल माहिती सांगितली जाते. या पुराणांमध्ये देवी-देवतांच्या कथा सांगितल्या आहेत. त्या कथांमधून जीवन जगण्याचे अनेक सल्ले देण्यात आले आहेत. या पुराणांमध्येच एक आहे, गणेश पुराण. गणपती बाप्पांच्या गणेश पुराणाबद्दल ऐकले असेल. गणेश पुराण नक्की काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाचं जानवं, उपरणं, धोतर, शेंडी.. गणेशोत्सवानिमित्त हेमांगीची पोस्ट चर्चेत

गणेश पुराणात पाच खंड आहेत. ते कोणते आणि त्या खंडात नेमके काय सांगितले आहे, याची माहिती घेऊयात.

प्रथम खंड

गणेश पारणातील या खंडात अशा कथा सांगितल्या आहेत. ज्यामुळे संसारातील सर्वांचेच कल्याण होईल. यातील पहिल्याच कथेत, संसाराची निर्मिती कशी झाली याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच, या खंडात भगवान शंकरांच्या विविध रूपांची माहिती देण्यात आलीय. तसेच, पुढील कथांमध्ये भगवान शंकरांनी जगाची उप्तत्ती कशी केली याबद्दल सांगण्यात आले आहे.

दुसरा खंड

गणेश जन्माच्या कथेने या खंडाची सुरूवात होते. तर, पुढे शिवलिंग आणि पद्मपुराणांना अनुसरून अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. तसेच, शेवटी गणेशांच्या जन्माची विस्तृत कथेचे वर्णन करण्यात आले आहे. (Ganesh Chaturthi 2023)

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाचा बड्डे! पुजाऱ्यांनी कापला केक अन् भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

तिसरा खंड

गणेश पुराणातील तिसरा खंड महत्त्वाचा मानला जातो. या खंडात माता पार्वतींच्या जन्माची, हिमायलाची पूत्री होण्याचा प्रवास दिला आहे. तर, पार्वती मातेचा भगवान शंकरांसोबत विवाह सोहळा कसा पार पडला. तारकासुराचा वध आणि कार्तिकेयांचा जन्म याचेही सुरेख वर्णन यात करण्यात आलंय. या खंडात विशिष्ठ यांनी सांगितलेली अरण्यराजाची कथाही आहे.

चौथा खंड

या खंडात युद्धाशी संबंधित कथा आहेत. याच्या सुरूवातीलाच मत्सर नावाच्या आसुराची कथा आहे. ज्याने आसुरांचे गुरू शुक्राचार्य यांच्याकडून शिव पंचाक्षरी मंत्राची दिक्षा घेतली होती. त्याच्या पुढे तारकासुराची कथा आहे. ज्याने ब्रह्मदेवांची तपस्या करून त्रैलोक्याचे अधिपतीत्व मागितले होते.

या खंडात महोदर आणि महासुर या आसुरांच्या युद्धाची कथाही आहे. लोभासुर या आसुराने मत्सर भावनेने गणपतीसोबत युद्ध केले. त्याला स्वत:ची चूक लक्षात आली तेव्हा तो गणेशांच्या चरणी नतमस्तक झाला.   (Ganesha)

Ganesh Chaturthi 2023
Garuda Purana: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात 'हे' लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण

पाचवा खंड

पाचव्या खंडात महादेवांच्या पुण्य कथांची माहिती दिली आहे. यामध्ये सूत ऋषिंनी गणेश आणि पार्वती युगांची माहिती दिली आहे. पुढे, सतयुग, त्रेतायुग आणि द्वापर युगाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तारकासुर, जन्मासुर यांच्या कथांची समाप्तीही या खंडात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com