Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल

लसणाचा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर
Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल

Garlic Tea For Health : राष्ट्रीय लसूण दिवस दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना लसणाच्या फायद्यांबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. लसूण त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी शतकानुशतके लोकप्रिय आहे. लसून कच्चा खाणे, लसणापासून बनलेले पदार्थ खाणे हे फायद्याचे ठरते.

जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लसूण शरीरातील अनेक समस्या दूर करण्यात आणि उपचार करण्यात मदत करू शकतो. अशा परिस्थितीत लसणाचा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल
Blue Tea : ग्रीन टी ऐवजी प्या ब्लू टी, डोकेदुखी आणि मासिक पाळीचे दुखणे होईल दूर..

अनेक लोक चहाचे शौकीन असतात. थकवा दूर करण्यासाठी किंवा डोकेदुखीच्या वेळी अनेकांना चहा प्यायला आवडते. अशा स्थितीत लसणाचा चहा घेणे हेल्दी आणि चविष्ट उपाय ठरू शकते. हा चहा बनवायला सोपा आहे. याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. (Tea For Health)

Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल
Tea Addiction : चहाचं व्यसन कसं सोडवावं? या टिप्स वापरा अन् चहाला करा Good Bye

लसूण चहाचे फायदे

  • लसणामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

  • हे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

  • रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास देखील प्रतिबंधित करते, ज्यामुळे हृदय अपयश आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • या चहामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल
Chamomile Tea Benefits : पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे कॅमोमाईल टी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

लसूण चहा कसा बनवायचा?

साहित्य

  • 2-3 लसूण पाकळ्या, ठेचून

  • १ कप पाणी

  • १/२ टीस्पून आल्याचा रस

  • 1/4 टीस्पून मध

  • लिंबाचा रस (चवीनुसार)

Garlic Tea For Health : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे, रेसिपी नोट करून घ्या, उपयोगी पडेल
Tea and Health : जगातील इतक्या देशांमध्ये आहेत चहाप्रेमी! नियमितपणे चहा पिणारे जगात आहेत एवढी लोकं?

चहा कसा बनवायचा

  1. एका भांड्यात पाणी उकळून घ्या.

  2. उकळत्या पाण्यात लसूण पाकळ्या घाला आणि 5 मिनिटे उकळवा.

  3. गॅस बंद करून त्यात आल्याचा रस आणि मध टाका.

  4. चहा गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा.

  5. हा चहा कोमट असतानाच प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com