esakal | सेल्फी घेण्यासाठी बायका काय काय करतात? गुगलने केला अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

selfie

गुगलद्वारे केल्या गेलेल्या एका जागतिक अभ्यासानुसार, चांगली सेल्फी घेण्यासाठी अमेरिका आणि भारतामध्ये 'फिल्टर'चा सर्वाधिक वापर केला जातो.

सेल्फी घेण्यासाठी बायका काय काय करतात? गुगलने केला अभ्यास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुगलद्वारे केल्या गेलेल्या एका जागतिक अभ्यासानुसार, चांगली सेल्फी घेण्यासाठी अमेरिका आणि भारतामध्ये 'फिल्टर'चा सर्वाधिक वापर केला जातो. फिल्टर म्हणजे फोटोला अधिक सुंदर बनवण्याचा पर्याय होय. या अभ्यासात भाग घेणाऱ्यांपैकी जर्मनीच्या तुलनेत भारतीय लोकांनी मुलांवर 'फिल्टर्स' च्या परिणामाबद्दल फारशी चिंता व्यक्त केली नाही. या अभ्यासानुसार, एँड्रॉइड मध्ये फ्रंट कॅमेऱ्यामधून 70 टक्क्यांहून अधिक सेल्फी काढल्या जातात. भारतीयांमध्ये सेल्फी काढणे आणि तो दुसऱ्यांना पाठवण्याची क्रेझ आहे. तसेच स्वत:ला सुंदर दाखवण्यासाठी फिल्टर हा एक चांगला पर्याय म्हणून भारतीय त्याकडे पाहतात. 

हेही वाचा - पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या
या अभ्यासात म्हटलंय की, भारतीय महिला खासकरून आपल्या फोटोला अधिक सुंदर बनवण्यसाठी उत्साहित असतात. आणि यासाठी त्या अनेक फिल्टर ऍप तसेच एडिटींग टूलचा वापर करतात. यासाठी 'पिक्स आर्ट' तसेच 'मेकअप प्लस' या ऍपचा सर्वाधिक वापर केला जातो. तर अधिकतर तरुण लोक स्नॅपचॅटचा वापर सर्वाधिक करतात. 
त्यांनी म्हटलं की, सेल्फी घेणे आणि तो इतरांसोबत शेअर करणे हा  भारतीय महिलांच्या आयुष्याचा आता अविभाज्य भाग बनतोय. हा प्रकार त्यांच्या दैनंदिन जीवनाला तसेच त्यांच्या घरगुती अर्थशास्त्राला देखील प्रभावित करतो. अनेक महिलांनी म्हटलंय की जर त्यांना सेल्फी घ्यायचा असेल तर त्यांनी पूर्वी घातलेले कपडे पुन्हा त्यासाठी घालत नाहीत. 

हेही वाचा - सैनिक भरतीची तयारी करताय?; शारीरिक निकषांत केलेले 'हे' मोठे बदल जरुर वाचा
या अध्ययनानुसार, भारतीय पुरुष देखील सेल्फी घेणे आणि फिल्टरचा वापर करण्यामध्ये काही मागे नाहीयेत. मात्र ते स्वत: कसे दिसतात यापेक्षा फोटोमागच्या गोष्टीला जास्त महत्त्व देताना दिसतात. भारतीयांनी लहान मुलांवर फिल्टरच्या परिणामाबाबत अधिक चिंता व्यक्त केली नाहीये. त्यांचा या फिल्टरच्या वापराप्रतीचा दृष्टीकोन अगदी सहज आहे तसेच ते याकडे मजेच्या दृष्टीनेच  पाहतात. या अध्ययनात म्हटलं गेलंय की भारतीय आई-वडिल आपल्या मुलांच्या मोबाईल्या अधिक वापराबाबत तसेच त्याच्या सुरक्षिततेबाबत अधिक चिंतीत दिसून येतात. 

loading image
go to top