esakal | सैनिक भरतीची तयारी करताय?; शारीरिक निकषांत केलेले 'हे' मोठे बदल जरुर वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

army recruitement

सैनिक पदासाठी भरती होणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वजन आता त्यांच्या उंचीच्या अनुसार निश्चित होणार आहे.

सैनिक भरतीची तयारी करताय?; शारीरिक निकषांत केलेले 'हे' मोठे बदल जरुर वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लखनऊ : भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या पुरुष उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सैनिक पदासाठी भरती होणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वजन आता त्यांच्या उंचीच्या अनुसार निश्चित होणार आहे. आतापर्यंत हा नियम सैन्यात भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी होता. आता या नियमाला सैनिक पदावर भरती होणाऱ्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत सैन्यात सैनिक पदावर भरतीसाठी पुरुष उमेदवारांचे कमीतकमी वजनाची मर्यादा ही 50 किलो आणि जास्तीतजास्त 62 किलो होती. आता नव्या नियमांनुसार, उंचीनुसार जास्तीतजास्त वजनाची मर्यादा वाढेल. 

हेही वाचा - Corona : कधी येईल लस आणि काय असेल किंमत; 'सीरम'चे आदर पूनावाल यांनी दिली माहिती
सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पहिल्यापेक्षा अधिक तंदुरुस्त व्हावं लागेल. त्यांना आता कमीतकमी 50 किलो वजानाच्या ऐवजी आपल्या उंचीच्या अनुसार वजनाच्या निकषात सफल व्हावं लागेल. सेना आता आणखी ठोस आणि दमदार उमेदवारांना निवडण्यासाठी म्हणून वजनाच्या निकषांमध्ये बदल करत आहे. सैन्याचे स्वतंत्र भरती बोर्ड दिल्लीने पायलट प्रोजेक्ट म्हणून आपल्या इथे या नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरवात देखील केली आहे. देशातील इतर सर्व भरती मुख्यालयांना ही सुचना पाठवली गेली आहे. 


खरंतर सैन्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांच्या भौगोलिक  परिस्थितीनुसार तिथल्या उमेदवारांची उंची आणि वजन ठरवलं गेलं आहे. उत्तर प्रदेशातच सैनिक जीडी, सैनिक ट्रेड्समॅन, स्टोअर किपर आणि नर्सिंग सहाय्यक सारख्या पदांसाठी शारिरीक मापदंड ठरवले गेले आहेत. सैनिक जीडी पदासाठी उमेदवाराची कमीतकमी उंची 170 सेमी आणि वजन 50 किलो आहे. तर 62 किलोहून अधिक वजन असेल तर उमेदवाराला अयोग्य ठरवलं जाईल. आता नव्या निकषांनुसार अधिकाधिक वजनाची मर्यादादेखील उंचीसोबत वाढेल. 

हेही वाचा - व्यायामावेळी मास्क वापरणे फुफ्फुसांसाठी धोकादायक नाही, संशोधनात सिद्ध

असे होतील बदल
उंचीनुसार वजन निश्चित करण्याचा नियम आतापर्यंत सैन्य अधिकाऱ्यांसाठी होता. याशिवाय नौसेना आणि वायुसेनेमध्येही इतर रँकच्या जवानांना भरतीसाठी उंचीच्या अनुसार वजनाचा नियम लागू आहे. याद्वारे सेनेच्या तिन्हीही प्रकारांमधील जवानांमध्ये फिटनेसची एकरुपता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधीही सेनेने यावर्षी एप्रिलपासून मेडीकल निकषांमध्ये काही बदल केले होते. 
उत्तर प्रदेश सारख्या राज्यात जिथे उमेदवारांसाठी कमीतकमी उंची 170 सेमी ठेवली गेली आहे. त्यांचे कमीतकमी वजन 50 किलोहून वाढवून 52 किलो ठेवलं  गेलं आहे. यामध्ये 17 ते 20 वर्षे वयाच्या उमेदवारांचे जास्तीतजास्त वजन 63.3 किलो आणि 20 वर्षांहून अधिक वयाच्या उमेदवाराचे वजन 66.5 किलो असेल. 

loading image
go to top