Habits For Good Sleep : रात्री एवढंच काम करा आणि उडालेली झोप परत मिळवा, सोप्पं असतंय ते!

मेडिटेशन केल्याने चांगली झोप येऊ शकते
Habits For Good Sleep
Habits For Good Sleep esakal

Habits For Good Sleep : काही लोकांसाठी शांत झोप मिळणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. याचे कारण असे की, झोप आणि मनाला हवी असलेली शांती कोणत्याही स्वरूपात विकत घेता येत नाही. आपल्या डोक्याला २४ तास विचार करण्याची सवय लागली आहे.   

यामुळेच झोपेच्या वेळीही आपण विचार करतो, रात्रभर कुस बदलत राहतो. आणि पहाटे कधीतरी आपल्याला झोप लागते. तीही केवळ तासाभरासाठी. या अपूर्ण झोपेचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. केवळ आरोग्य नाहीतर मग दिवसभर आळस येणं, पेंग येणं असे प्रकार घडू लागतात. 

याचा परिणाम म्हणजे तुमचे मित्र तुमची खिल्ली उडवायला लागतात. याचा कामावरही परिणाम होतो. त्यामुळेच शांत झोपेसाठी काय करावं, यासाठी काही टिप्स पाहुयात.  

Habits For Good Sleep
Over Sleeping Symptoms : सतत आसळ, झोप येत असेल तर हे उपाय करा; शरीरात नवा उत्साह संचारेल

झोपेची वेळ निश्चित करा

शांत झोप येण्यासाठी झोपेची वेळ निश्चित करावी. ज्यामुळे तुमच्या शरीरालाही काही सिग्नल्स मिळतात. की आता झोपेची वेळ झाली आहे.खूप प्रयत्न करूनही झोप येत नसेल तर एखादं पुस्तकं घेऊन वाचावं ज्यामुळे तुम्हाला झोप येईल.

मेडिटेशन करा

झोपण्यासाठी जेव्हा तुम्ही बेडवर येता. तेव्हा झोप येईपर्यंत मोबाईल पाहत बसता. रिल्स, व्हिडिओ किंवा एखादं महत्त्वाचं कामही मोबाईलवर सुरू असतं. पण याच वेळेत तुम्ही १५ ते २० मिनिटे मेडिटेशन करून तुम्हाला शांत झोप मिळू शकते.  

Habits For Good Sleep
Sleep After Lunch-Dinner : जेवणानंतर लगेच झोपता? ही सवय लगेच सोडा नाहीतर..

स्ट्रेचिंग एक्सरसाइज

झोपण्यापूर्वी बेडवर काही स्ट्रेच एक्सरसाइज किंवा योगा करा. ज्यामुळे शरीरात ताण निर्माण होतो. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि त्यांचा सर्व ताण दूर होतो. जे लवकर आणि गाढ झोप येण्यास मदत करते.

शांत झोपेसाठी या चूका टाळा

जड जेवण टाळा

रात्रीचे जेवणाची वेळ लवकर असावी. झोपण्याच्या २-३ तास ​​आधीच जेवत जा. तसेच रात्रीचे जेवण पचायला हलके असेल असेच घ्या पद्धतीने घ्यावे. जेणेकरुन झोपेचा त्रास होणार नाही.

Habits For Good Sleep
Sleep Cause Alzheimer's : झोपेच्या कमतरतेमुळे अल्झायमर होऊ शकतो का?

कॉफी किंवा चहापासून दूर राहा

रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीपासूनही दूर राहा. काहींना रात्रीच्यावेळी कॉफी पिण्याची हुक्की येते. पण ही सवय तुमची झोप उडवू शकते. कारण, कॅफिन मेंदूला चालना देते. जे झोपेत अडथळा आणतात. त्यामुळे कॉफी किंवा चहाचे सेवन कमीत कमी ठेवा.

पाणीदार पदार्थ कमी घ्या

झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी प्या. काही लोकांना रात्रीच्या जेवणानंतर जास्त पाणी पिण्याची सवय असते. हि चांगली सवय असली तरी यामुळे सतत लघवी येण्याची शक्यता असते. यामुळे झोपेचे बारा वाजतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com