
Hair Care Diet : गेल्या दोन वर्षात केसांच्या समस्या वाढल्यात? ट्राय करा हे डाएट
Hair Care Diet : गेल्या दोन वर्षात केसांशी निगडीत समस्या वाढल्याचं प्रमाण बरंच दिसत आहे. याचं एक महत्वाचं कारण कोरोना असल्याचं समोर आलं आहे. आता आपण बऱ्याच प्रमाणात या समस्येतून बाहेर पडलेलो असलो तरी याचे साइड इफेक्टस् कुठल्या ना कुठल्या कारणाने समोर येत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
केसगळती रोखायची असेल तर सगळ्यात आधी अन्नातून आपल्याला पोषण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आहारात बदल करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: Hair Care : मऊ अन् सुंदर केसांसाठी आलियाच्या खास टिप्स

Black Raisins
आहारात करा हे ३ बदल
१. काळे मनुके
काळे मणुके अतिशय पोषक असतात. काळ्या मणुक्यांद्वारे खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती मिळते. त्यामुळे केसगळती थांबविण्यासाठी हा उपाय जरूर करून पहावा. रोज रात्रभ १५ ते २० काळे मनुके पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी बारीक चावून हे मनुके खावेत. यामुळे केसगळती खूपच लवकर कमी होऊ शकते.
हेही वाचा: Malaika Arora : मलायका Hair Care साठी करते 'हा' खास घरगुती उपाय

Amla
२. आवळ्याचे सेवन वाढवा.
आवळा केसांसाठी पोषक असतो. कारण त्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, लोह असते. त्यामुळे केसांसाठी हे सगळेच खूप फायद्याचे आहे. त्यामुळे आवळ्याचा ज्यूस, चटणी, मुरांबा अशा वेगवेगळ्या पदार्थातून आवळा पोटात गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. केसगळती अवघ्या काही दिवसातच कमी होते.
हेही वाचा: Hair Care Tips: लग्न ठरलंय? नवरीने चुकूनही करू नये केसांवर असे एक्सपिरीमेंट्स

Curry Leaves
३. कढीपत्ता
कढीपत्त्यामध्ये बीटा-केरोटिन, अँटीऑक्सीडेंट्स आणि अमीनो ॲसिड यांचे उत्तम प्रमाण असते. त्यामुळे कढीपत्ता खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी १ कप पाणी घ्यावे. त्यामध्ये १५ ते २० कढीपत्त्याची पाने टाका. हे पाणी चांगले उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाले की गॅस बंद करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. दोन- तीन आठवडे हा प्रयोग रोज केल्यास केसगळती कमी होते.