Health Benefits Of Garlic : तुम्ही महिनाभर उपाशी पोटी लसून खाल्ला तर काय होईल?

नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते
Health Benefits Of Garlic
Health Benefits Of Garlicesakal

Health Benefits Of Garlic : आपल्या जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. पूर्वी दररोजच्या कामामधून शारीरिक व्यायाम होत असे. मात्र, आता व्यस्त जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही. असे असले तरी मधुमेहींनी व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, नियमित व्यायामामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यासाठीच मधुमेहींनी स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

लसूण हा एक मसाला आहे जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असतो, जर तो भाज्या किंवा इतर पाककृतींमध्ये टाकला तर टेस्ट वाढते, लसूण गरम होतो आणि त्याचबरोबर त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका टळतो.

Health Benefits Of Garlic
पुरुषांनी लसूण खाणे फायद्याचे, वाचा का ते?

नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लसूण बी ६ आणि सी जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन बी ६ चयापचयसाठी उपयुक्त आहे. तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील मोलाची भूमिका बजावू शकते.

लसूण कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्या मते लसूण सकाळी रिकाम्या पोटी खावे कारण त्याचे अनेक फायदे होऊ शकतात.

लसूण खाण्याचे फायदे

• रक्तदाब राहतो नियंत्रणात

• वजन कमी करण्यास होते मदत

• हृदय राहते स्वास्थ

• सर्दी-खोकल्यावरही उपयोगी

• पचनक्रिया सुधारते

• श्वास घेण्याच्या त्रासावर उपयोगी

• कॅन्सरचा धोका होतो कमी

• कोलोस्टेरॉल करते कमी

• मधुमेहाचा धोका होतो कमी

• हिमोग्लोबिन वाढते

Health Benefits Of Garlic
Healthy Chutney Recipe : लसूण-कोथिंबीरची 'ही' चटणी मजबूत करते इम्युनिटी, ही आहे बनवण्याची सोपी पद्धत

कॅन्सर प्रतिबंध

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे काहीही न खाता सकाळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल.

मधुमेह नियंत्रित ठेवतो

मधुमेहात मदत करणाऱ्या लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ कळ्या खाव्यात.

प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक

अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच याचं सेवन केल्यामुळे आपलं शरिर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं.

Health Benefits Of Garlic
High BP Patient : या रूग्णांसाठी लसूण फायद्याचं, फक्त खाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

त्वचा ठेवतं तजेलदार

अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो तसेच आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते. आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

वजन कमी होते

जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही कळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. यामध्ये अशी काही संयुगे आढळतात जी शरीरातील अतिरिक्त चरबी वितळविण्यास मदत करतात.

Health Benefits Of Garlic
Garlic Benefits : लसूण खा अन् कोलेस्ट्रॉल कमी करा

डिप्रेशनशी लढण्याची ताकद

मानसिक आरोग्यासाठीही लसणाचे सेवन महत्वाचे आहे, याच्या मदतीने आपले मन संतुलित राहते आणि डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते. तणाव टाळण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

असाही मिळतो फायदा

भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यासाठी एका पातेल्यात लसूण भाजून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करा. अशाप्रकारे उच्च रक्तदाबामध्ये लसणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. फक्त लक्षात ठेवा दिवसभरात जास्त लसूण खाऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com